22 November 2024 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा अटक

Ravi Pujari arrested

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा आफ्रिका खंडातील सेनेगल या देशात अटक करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी व कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या पूर्ण केली जात असून आज संध्याकाळी किंवा उशिरा रात्री त्याला घेऊन पोलीस भारतात परततील, अशी शक्यता आहे.

दरम्यान, ९० च्या दशकातील कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये अटक झाली असून, त्याला भारतात आणण्याची प्रकिया सुरु आहे. त्यासाठी कर्नाटक पोलिसांची विशेष टीम आणि ‘रॉ’ चे पथक सेनेगलमध्ये तळ ठोकून आहे.

रवी पुजारी सेनेगलमध्ये अँटोनी फर्नांडीस या नावाच्या पासपोर्टवर सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट १० जुलै २०१३ देण्यात आला होता. याची मुदत ८ जुलै २०२३ पर्यंत आहे. पासपोर्टनुसार तो एक व्यावसायिक एजंट आहे. याचा अर्थ असा की तो एक व्यापारी म्हणून ओळखला जात होता. सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये ‘नमस्ते इंडिया’ नावाच्या रेस्टॉरंट्सची साखळी चालवित असल्याचे भासविले जात होते.

 

Web Title: Story underworld don Ravi Pujari arrested.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x