24 November 2024 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

दिल्लीत बाहेरचे दंगेखोर घुसले आहेत; ती दिल्लीतील जनता नाही: मनीष सिसोदिया

CM Arvind Kejariwal, DCM Manish Sisodia, violence in north east Delhi, CAA Protest

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारात एकूण ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात एक पोलीस आणि ६ नागरिकांचा समावेश आहे. तर ७५ हून अधिकजण जखमी झाले आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मृतदेहांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा आढळल्या आहेत, तर दगडफेकीत गंभीर इजा होऊन हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. दिलशाद गार्डनमधील गुरु तेग बहादूर रुग्णालयात हिसांचारातील जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह येथील शवागृहात ठेवण्यात आले आहेत. आज हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

दरम्यान, यावेळी मौजपूर भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे. तो तेथील स्थानिक रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. हा तरूण पोलिसांसमोर देखील गोळीबार करत होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही न जुमनता त्यांने बंदुकीद्वारे आठ गोळ्या झाडल्या. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

तसेच जामिया समन्वय समितीनं पोलिस मुख्यालयाबाहेर दिल्लीतील हिंसाचाराविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाचा पवित्रा मागे घेत पोलिसांसमोर काही मागण्या ठेवल्या. कपिल मिश्रा यांनी त्यांच्या भाषणातून व ट्वीटच्या माध्यमातून दिल्लीतील इशान्य भागात हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

मात्र परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली असून दिल्ली सरकारने केंद्राची देखील मदत मागितली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला असून एक पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती. दरम्यान या विषयावरून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “दिल्ली शहरात बाहेरचे दंगेखोर घुसले आहेत; ती दिल्लीतील सामान्य जनता नाही, ते ज्या कोणत्या धर्माचे आणि प्रांतातील असतील त्यांना ताबडतोब अटक करून तुरुंगात टाकायला हवं, ते जे कोणी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे” असं सिसोदियांनी म्हटलं आहे.

 

 

News English Summery: However, the situation has become more worrisome and the Delhi government has also sought the help of the Center. Chief Minister Arvind Kejriwal also reviewed the situation and organized a press conference. Meanwhile, Deputy Chief Minister Manish Sisodia has reacted angrily to the issue. In it, he said, “Outside rioters have infiltrated the city of Delhi; they are not the common peoples of Delhi; any religion and province they belong to should be immediately arrested and imprisoned, whichever they are, should be severely punished”.

 

Web Title: Story Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia reacted over violence in north east Delhi.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x