दिल्ली हिंसाचार लवकर न थांबल्यास त्याची व्याप्ती वाढेल: ओवेसी
नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारात एकूण ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात एक पोलीस आणि ६ नागरिकांचा समावेश आहे. तर ७५ हून अधिकजण जखमी झाले आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मृतदेहांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा आढळल्या आहेत, तर दगडफेकीत गंभीर इजा होऊन हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. दिलशाद गार्डनमधील गुरु तेग बहादूर रुग्णालयात हिसांचारातील जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह येथील शवागृहात ठेवण्यात आले आहेत. आज हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर ओवेसींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो साप पाळला आहे, तो त्यांना डसणार’ असं म्हणतं ओवेसींनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. हैद्राबादमध्ये सीएए-एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात एका बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘दिल्लीतील हा हिंसाचार एका माजी आमदारामुळे होत आहे. आता यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचेही पुरावे आता समोर आले आहेत. त्या माजी आमदारांना त्वरित अटक केली पाहिजे आणि लवकरात लवकर हिंसाचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असं न झाल्यास या हिंसाचाराची व्याप्ती वाढेल’ असं ओवेसींनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तत्पूर्वी मौजपूर भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे. तो तेथील स्थानिक रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. हा तरूण पोलिसांसमोर देखील गोळीबार करत होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही न जुमनता त्यांने बंदुकीद्वारे आठ गोळ्या झाडल्या. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
#दिल्ली हिंसाचार: बंदुकीतुन ८ गोळ्या झाडणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे. तो तेथील स्थानिक रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले आहे. pic.twitter.com/SKQxJpB1UO
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) February 25, 2020
तसेच जामिया समन्वय समितीनं पोलिस मुख्यालयाबाहेर दिल्लीतील हिंसाचाराविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाचा पवित्रा मागे घेत पोलिसांसमोर काही मागण्या ठेवल्या. कपिल मिश्रा यांनी त्यांच्या भाषणातून व ट्वीटच्या माध्यमातून दिल्लीतील इशान्य भागात हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
मात्र परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली असून दिल्ली सरकारने केंद्राची देखील मदत मागितली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला असून एक पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती. दरम्यान या विषयावरून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “दिल्ली शहरात बाहेरचे दंगेखोर घुसले आहेत; ती दिल्लीतील सामान्य जनता नाही, ते ज्या कोणत्या धर्माचे आणि प्रांतातील असतील त्यांना ताबडतोब अटक करून तुरुंगात टाकायला हवं, ते जे कोणी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे” असं सिसोदियांनी म्हटलं आहे.
लगता है शहर में दरिंदे घुस आए हैं. ये हमारी दिल्ली की आम जनता नहीं है. ये लोग जिस भी धर्म जाति क्षेत्र से हैं इन्हें तुरंत पकड़कर अंदर डालना चाहिए. कड़ी सजा मिलनी चाहिए. जो भी हो.
— Manish Sisodia (@msisodia) February 25, 2020
News English Summery: Meanwhile, Owaisi reacting to the whole incident, saying that the snake that Prime Minister Narendra Modi has followed will bite him, saying that Owaisi has left criticism on Modi. A meeting was organized in Hyderabad against CAA-NRC and NPR. They were talking at the time. ‘This violence in Delhi is caused by a former MLA. Evidence has now emerged that the police were involved in this. Those former MLAs should be arrested immediately and efforts should be made to stop the violence as soon as possible. Otherwise, the prevalence of violence will increase, “Owaisi said. An English website has reported this.
Web Title: Story Delhi North East violence snakes raised your backyard will bite you says MIM MP Asaduddin Owaisi PM Narendra Modi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News