24 November 2024 2:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मंत्री बाळासाहेब थोरातांचं सावरकरांना अभिवादन; राज्य काँग्रेसमध्ये आश्चर्य आणि चर्चा

Veer Savarkar, Minister Balasaheb Thorat

मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपनं आज विधानसभा अध्यक्षांकडं सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये सावरकारांविषयी मतभेद आहेत. त्यामुळं गौरवपर प्रस्तावावरून त्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आदरांजली वाहिली. भाजप नेते आशिष शेलार यांच्या विनंतीनंतर विधीमंडळात ठेवलेल्या सावरकरांच्या प्रतिमेवर थोरातांनी पुष्पांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या कामकाजासाठी जाताना अजित पवार यांनी माध्यमांकडं आपली भूमिका स्पष्ट केली. ‘चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात एखादी चर्चा येणार असेल तर कुणाला आक्षेप असण्याची हरकत नाही. गेल्या ३० वर्षांत मी अनेकदा अशा चर्चांमध्ये भाग घेतला आहे. सावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही,’ असं अजित पवार म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरुन शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही, सत्तेत भागीदारी असलेल्या काँग्रेसची नाराजी शिवसेनेला घ्यायची नाही. काँग्रेसने वीर सावरकरांबद्दल नेहमी अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली होती. ब्रिटिशांची माफी मागणाऱ्यांना भारतरत्न का द्यायचा असा सवाल काँग्रेसकडून विचारला जातो. त्यामुळे सावरकर मुद्द्यावरुन शिवसेना -काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत.

 

News English Summery: Congress State President and Revenue Minister Balasaheb Thorat greeted the image of the freedom fighter Savarkar and paid his respects. After the request of BJP leader Ashish Shelar, Thoratat wore floral wreath on the image of Savarkar kept in the legislature. A tribute is being paid to them on the occasion of the death anniversary of the freedom fighters Savarkar.

 

Web Title: Story Leader Balasaheb Thorat pays tribute to Veer Savarkar in Vidhasnabha.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x