22 November 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार: सोनिया गांधी

Amit Shah, Sonia Gandhi, Narendra Modi

नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भावना भडकतील अशी भाषणे करत द्वेष पसरवण्याचे काम केले असा थेट आरोप सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील पोलिसांनी तीन दिवसांची मुदत देत, यानंतर जे काही होईल त्याबद्दल आम्हाला सांगू नका अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली, असे सांगत या हिंसाचारात २० पेक्षा अधिक लोकांचे बळी गेल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

मागील ३ दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार भडकलेला असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या काही नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच हा हिंसाचार भडकला असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान गेली तीन दिवस कुठे होते असा सवालही त्यांनी केला. दिल्ली सरकारलाही परिस्थिती नियंत्रण आणण्यास अपयश आल्याचं त्यांनी सांगितलं. अमित शहा यांनी जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

 

 

News English Summery: The Congress party has demanded that the central government, Home Minister Amit Shah be responsible for the violence in Delhi, and that Home Minister Amit Shah is responsible for the situation in Delhi. Congress chief Sonia Gandhi targeted the Union government, Home Minister Amit Shah and Delhi Chief Minister Kejriwal, saying that the Delhi Chief Minister had also failed to maintain peace in Delhi and did not take responsibility. Sonia Gandhi was speaking at a press conference held after the meeting of the Congress Party Working Committee.

 

Web Title: Story Union home minister Amit Shah and Modi Government are responsible for Delhi violence alleged congress President Sonia Gandhi.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Soniya Gandhi(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x