22 November 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

इयत्ता पहिली ते दहावी मराठी अनिवार्य; सर्व मंडळांच्या शाळांना कायदा लागू

Marathi Mandatory in School

मुंबई : आज ‘मराठी भाषा दिन’, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

आता शैक्षणिक क्षेत्रातून एक मोठी बातमी आली आहे. राज्यात पहिली ते दहावी मराठी विषय लवकरच सक्तीचा होणार आहे. मराठी भाषा सक्ती करण्याबाबतचं विधेयक विधानपरिषदत एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे. आता हे विधेयक विधानसभेत मांडलं जाणार आहे.. दरम्यान आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण असल्याचं यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नमूद केलं आहे.

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व प्रकारच्या मंडळांच्या शाळांमध्ये पहिले ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याचे विधेयक मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी विधान परिषदेच्या सभागृहात एकमताने संमत करण्यात आले. या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळेच्या प्रमुखांना एक लाख रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच अशा शाळांची मान्यतादेखील काढून घेण्याची स्पष्ट तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकाची अंमलबजावणी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून होईल, असे सरकारने स्पष्ट केले. आयसीएसई, सीबीएसई, एनआयओएस, आयजीसीएसई, एमआयईबी, सीआयएसई, बॅकलोरिएट, आयबी, ओरिएंटल तसेच सर्व मंडळांच्या शाळांना हा कायदा लागू असेल, असे मंत्री देसाई म्हणाले.

 

News English Summery: On the eve of Marathi Language Day, a bill was passed unanimously in the Legislative Council’s House on the eve of Marathi Language Day, in the schools of all media boards of Maharashtra. The head of the school who does not enforce the law will be fined Rs one lakh. There is also a clear provision to remove the accreditation of such schools. The government will implement the bill from the next academic year, it said. Minister Desai said that the law would be applicable to schools of ICSE, CBSE, NIOS, IGCSE, MIEB, CISE, Bachelorette, IB, Oriental as well as all the boards.

 

Web Title: Story bill to make Marathi must in Maharashtra in all schools.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x