24 November 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

दिल्ली हिंसाचार: गटारे आणि नाल्यांत सापडत आहेत त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह

Delhi Violence, Delhi Riots, Hindu Muslims

नवी दिल्ली: सलग ३ दिवस हिंसाचाराने होरपळल्यानंतर दिल्ली आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हिंसाचारग्रस्त भागातल्या रस्त्यांवर पडलेले दगड, इतर वस्तू यांची साफसफाई सुरु आहे. दिल्लीची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. काल संध्याकाळी किंवा आज सकाळी हिंसा झाल्याची कोणतीही घटना अद्यापपर्यंत घडलेली नाही. सीएए आणि एनआरसी कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात गेल्या रविवारी दगडफेक झाली. त्यानंतर ३ दिवस पूर्व दिल्ली पेटत राहिली. या हिंसाचारात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

सुधारित नागरिकत्त्व कायद्यावरून पेटलेली ईशान्य दिल्ली आता थंड होऊ लागली आहे. हिंसाचार शांत झाल्यानंतर गुरुवारपासून दंगलग्रस्त भागातील रस्त्यांची सफाई करण्यास ईशान्य दिल्ली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. या साफसफाई दरम्यानं केवळ कर्दमपुरी या एका दंगलग्रस्त भागातूनच २ हजार किलो विटांचे तुकडे गोळा करण्यात आले आहेत.

सध्या लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असताना जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

तर हिंसाचारात जाळलेल्या दुचाकी आणि चारचाकी देखील रस्त्यावरून नंतर हटवण्यात येणार आहेत. जळालेल्या वाहनांची पुराव्यासाठी चित्रफिती तयार करण्यात येणार आहेत. वाहन चालकांना विम्यासाठी त्याची गरज भासू शकते असे पोलिसांनी सांगितलं.

 

News English Summery: An out-of-house Intelligence Bureau official was also killed when violence escalated in Delhi. The primary mutilation report of this officer has surfaced. The violent mob killed the officer in a cruel, brutal manner. According to the Times of India, the officer was killed and his body was found with 200 wounds. The violent mob is believed to have killed the officer earlier and then killed him. The body of the officer was found in a drain about one km from the house. A FIR was registered on Thursday against Aam Aadmi Party councilor Tahir Hussain for the murder of an IB officer. The FIR was registered at the Dayalpur police station on the complaint of his father.

 

Web News Title: Story Delhi City violence situation under control after 38 peoples has lost their lives.

हॅशटॅग्स

#Delhi(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x