देशात लोकशाही केवळ निवडणूकी पुरती शिल्लक - प्रकाश सिंह बादल
नवी दिल्ली: सलग ३ दिवस हिंसाचाराने होरपळल्यानंतर दिल्ली आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हिंसाचारग्रस्त भागातल्या रस्त्यांवर पडलेले दगड, इतर वस्तू यांची साफसफाई सुरु आहे. दिल्लीची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. काल संध्याकाळी किंवा आज सकाळी हिंसा झाल्याची कोणतीही घटना अद्यापपर्यंत घडलेली नाही. सीएए आणि एनआरसी कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात गेल्या रविवारी दगडफेक झाली. त्यानंतर ३ दिवस पूर्व दिल्ली पेटत राहिली. या हिंसाचारात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
सुधारित नागरिकत्त्व कायद्यावरून पेटलेली ईशान्य दिल्ली आता थंड होऊ लागली आहे. हिंसाचार शांत झाल्यानंतर गुरुवारपासून दंगलग्रस्त भागातील रस्त्यांची सफाई करण्यास ईशान्य दिल्ली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. या साफसफाई दरम्यानं केवळ कर्दमपुरी या एका दंगलग्रस्त भागातूनच २ हजार किलो विटांचे तुकडे गोळा करण्यात आले आहेत.
सध्या लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असताना जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.
#दिल्ली_हिंसाचार: मन हेलावून टाकणारं चित्र….. गटारे आणि नाल्यांत सापडत आहेत त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह.#DelhiViolence pic.twitter.com/t3QurbUbZM
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) February 28, 2020
दिल्लीतील हिंसाचारावर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलानं मोठं विधान केलं आहे. अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीत होत असलेला हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शांततेत जगणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या देशाच्या संविधानात तीन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. ज्यात धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीचा समावेश आहे. इथे धर्मनिरपेक्षता किंवा समाजवाद नाही. श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे, तर गरीब आणखी गरीब होत गेला आहे. लोकशाहीसुद्धा फक्त दोन स्तरावरच शिल्लक राहिली आहे. एक लोकसभा निवडणूक आणि दुसरी विधानसभा निवडणूक, बाकी काहीही नाही.
Shiromani Akali Dal leader Parkash Singh Badal: #DelhiViolence is very unfortunate. There are three highlights of Constitution – secularism, socialism & democracy. But there is no socialism, secularism and democracy exists only on two levels – Parliamentary & state elections. pic.twitter.com/CUu5BXCkKb
— ANI (@ANI) February 28, 2020
News English Summery: The Akali Dal, a friend of the BJP, has made a big statement on the violence in Delhi. Akali Dal leader and former Punjab Chief Minister Prakash Singh Badal has raised questions on secularism, socialism and democracy. Violence in Delhi is a very unfortunate thing. It is very important to live in peace. The Constitution of our country underlines three things. Which includes secularism, socialism and democracy. There is no secularism or socialism. The rich are getting richer, while the poor are getting worse. Democracy has also been left on two levels. One Lok Sabha election and another Assembly election, nothing else.
Web News Title: Story Delhi violence NDA Party Akali Dal leader Prakash Singh Badal Secularism democracy comments.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News