24 November 2024 9:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

BSF'च्या जवानाचे घरही दंगलखोरांनी जाळले; सहकारी मदतीला धावले

BSF Jawans, Delhi Violence

नवी दिल्ली: देशाच्या रक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या एका जवानाचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. दरम्यान, ही बाब बीएसएफमधील त्याच्या वरिष्ठांना समजल्यानंतर त्यांनी या जवानाची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहेत. सदर जवानाचे घर उभारून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे बीएसएफच्या डीजींनी सांगितले आहे.

मोहम्मद अनिस असे घर जाळण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. ते बीएसएफमध्ये सेवेत आहेत. दिल्लीत दंगल भडकल्यावर खजूरी खास परिसरात असलेले हनिफ यांचे घरही दंगलखोरांनी पेटवून दिले. दैव बलवत्तर म्हणून अनिस यांचे कुटुंबीय बचावले. मात्र राहते घरच बेचिराख झाल्याने अनिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

दरम्यान, सलग ३ दिवस हिंसाचाराने होरपळल्यानंतर दिल्ली आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हिंसाचारग्रस्त भागातल्या रस्त्यांवर पडलेले दगड, इतर वस्तू यांची साफसफाई सुरु आहे. दिल्लीची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. काल संध्याकाळी किंवा आज सकाळी हिंसा झाल्याची कोणतीही घटना अद्यापपर्यंत घडलेली नाही. सीएए आणि एनआरसी कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात गेल्या रविवारी दगडफेक झाली. त्यानंतर ३ दिवस पूर्व दिल्ली पेटत राहिली. या हिंसाचारात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

सुधारित नागरिकत्त्व कायद्यावरून पेटलेली ईशान्य दिल्ली आता थंड होऊ लागली आहे. हिंसाचार शांत झाल्यानंतर गुरुवारपासून दंगलग्रस्त भागातील रस्त्यांची सफाई करण्यास ईशान्य दिल्ली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. या साफसफाई दरम्यानं केवळ कर्दमपुरी या एका दंगलग्रस्त भागातूनच २ हजार किलो विटांचे तुकडे गोळा करण्यात आले आहेत.

सध्या लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असताना जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

 

News English Summery: Rioters also torched the house of a BSF jawan who was deployed on the frontier to save the country. Meanwhile, after realizing the matter to his superiors at BSF, he has taken the initiative to help the youth. The BSF’s DG has said that all the help would be given to build the house. Mohammad Anis is the name of a young man burnt to death. He is in the BSF. After the riots broke out in Delhi, rioters also torched Hanif’s house in Khajuri area. Divine supremacy rescues Anis’ family. However, due to poor living in the house, Anis and his family have faced a great crisis.

 

Web News Title: Story Delhi violence riot burns BSF Jawans house colleague rushes for help.

हॅशटॅग्स

#Delhi(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x