28 April 2025 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 29 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार, दिग्गज ब्रोकिंग फर्मने दिले संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा; मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

आम्ही औरंगजेबाचे वंशज नाही; संभाजीनगर नामकरण झालेच पाहिजे: चंद्रकांत पाटील

Sambhajinagar, Aurangabad

औरंगाबाद: आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत. औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असे नामकरण झालेच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याला हात घातला. औरंगाबाद शहराचे नवा संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत. त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या प्रक्रियेला गती देऊन शहराचे नाव बदलले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे”, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पाटील औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पाटील यांनी आज दिवसभर बैठकांचा धडाका लावला आहे. संघाच्या प्रतिनिधींसोबत सकाळी त्यांची बैठक झाली. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना औरंगाबादचं नाव बदललंच पाहिजे, असं ते म्हणाले. ‘नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत,’ असं ते म्हणाले.

 

News English Summery: We are descendants of Chhatrapati Sambhaji Maharaj. Not Aurangzeb’s. Therefore, BJP state president Chandrakant Patil demanded that Aurangabad should be named as ‘Sambhajinagar’. He was talking to the media in Aurangabad on Saturday. This time, he touched on the issue of renaming of Aurangabad. Aurangabad city must be the new Sambhajinagar. In the case of renaming, there are some technical errors. They should be removed as soon as possible. You are not a descendant of Aurangzeb, ”said Patil.

 

Web News Title: Story BJP State President Chandrakant Patil on Aurangabad city mutation Sambhajinagar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या