22 April 2025 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही म्हणत सध्या सगळ तेच घेतात: चंद्रकांत पाटील

BJP President Chandrakant Patil, Rashmi Uddhav Thackeray, CM Uddhav Thackeray

औरंगाबाद: नरेंद्र मोदींनी अयोध्येत राममंदिर केले म्हणजे लोक आपल्याला मतदान करतील, अशा भ्रमात राहू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने भाजपने देखील कंबर कसल्याच पाहायला मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व उघडे पाडण्यात यशस्वी झालो तर निवडणुकीत यश हमखास मिळेल. पण त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, असे बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले असे म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री झाले. मुलालाही मंत्री केले, अशी टीकाही पाटील यांनी केली.

तत्पूर्वी नाशिक येथे बोलताना चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. आमचं सरकार असताना रश्मी ठाकरे यांना मी सिद्धिविनायकाचं अध्यक्षपद घ्या म्हणून आग्रह धरला होता. याबाबत मी उद्धव ठाकरे यांना स्वतः बोललो होतो. मात्र त्यांनी ते घेतलं नाही. त्यावेळी ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही असं मला तेव्हा म्हटलं होतं, पण आता ठाकरे सगळच घेत आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. नाशिकमध्ये भाजप कार्यालयात कोअर कमिटीची बैठक आज आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कुठलाही अनुभव नसताना त्यांनी मुलाला कॅबिनेट मंत्री केलं आहे. आता वहिनींना सामनाचं संपादक केलं आहे. वहिनी सामनाचं संपादक पद खूप चांगलं सांभाळतील, असंही ते म्हणाले.

तसेच नाशिक भाजपमधील अंतर्गत वादाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वगैरे नाही. हे शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सारखं असतं. सकाळी नाराजी असते संध्याकाळी एकत्र चहा घेतात. मतं वेगळ असतात आणि हे नैसर्गिक आहे, असं ते म्हणाले.

 

News English Summery: Earlier, while speaking in Nashik, Chandrakant Patil had interacted with the media. During our government, I urged Rashmi Thackeray to take over as president of Siddhivinayak. I spoke to Uddhav Thackeray about this. But they did not take it. At that time, I was told that the Thackeray family was not taking anything for themselves, but now Thackeray is taking everything, ”said Chandrakant Patil, the BJP state president. A meeting of the core committee was held today at the BJP office in Nashik. This time they were talking. Speaking to the media this time, he said that he had made the boy a cabinet minister without any experience. Now they have been made editor of the match. He will handle the post of editor of the match very well, he said.

 

Web News Title: Story BJP President Chandrakant Patil comment on Rashmi Uddhav Thackeray during Nashik meeting.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या