25 November 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

दिल्ली हिंसाचाराला भाजपच जबाबदार, पवारांची केंद्रावर सडकून टीका

NCP President Sharad Pawar, Union Home Amit Shah, PM Narendra Modi

मुंबई : दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपात आत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली निवडणुकीवेळी देशाच्या सामाजिक ऐक्याला धक्का लावणारा प्रचार केला. अशा व्यक्तींकडून हा प्रचार केला गेल्याने मलाही धक्का बसला. दिल्लीत अशी स्थिती निर्माण होण्याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करण्याची गरज नाही. सर्वांना माहिती कोण आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

पुढे पवार म्हणाले, देशासमोर आज जे प्रश्न आहेत, त्याबद्दलची चिंता देशभरातील सर्व घटकांमध्ये निर्माण झाली आहे. तशी स्थिती या ठिकाणी कधी होणार नाही. ज्या शक्ती आज सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना दूर ठेवण्यासाठी काय आवश्यकता आहे, काय पर्याय आहेत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.

चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता शिबिराचं आयोजन केलं होतं. त्याला संबोधित करताना शरद पवार यांनी दिल्लीतील हिंसाचारावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दिल्ली शहर अनेक भाषिकांचे आहे. राजधानीचे शहर आहे. दिल्लीच्या निर्मितीपासूनच भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्हे नव्हती. सत्ता मिळण्याची चिन्हंही दिसत नाही. त्यामुळे यावेळी सांप्रदायिकतेचा आधार घेऊन जातीय सलोखा बिघडवण्याचे काम झाले आहे, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला.

 

News English Summery: President of NCP Sharad Pawar has also jumped from the issue of political allegations on Delhi violence issue. Sharad Pawar has accused the BJP government of being responsible for the violence in Delhi. Pawar has said that the BJP is creating an uproar in the society after the failure of the Delhi Assembly elections. At a program in Mumbai, he attacked the BJP government at the Center. ‘Prime Minister Narendra Modi, Union Home Minister Amit Shah and other Union ministers campaigned against the social unity of the country during the Delhi elections. I was shocked by the publicity of such individuals. There is no need to inquire as to who is behind the creation of such a situation in Delhi. Speaking at the NCP’s rally in Mumbai, NCP President Sharad Pawar has accused the BJP of making a serious allegation.

 

Web News Title: Story NCP President Sharad Pawar slams PM Narendra Modi and Union Home Minister Amit Shah over Delhi violence.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x