22 November 2024 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजपसाठी हरयाणातील हॉटेल म्हणजे इतर पक्षाचे आमदार लपविण्याचा अड्डे? सविस्तर

BJP Operation Lotus, Madhya Pradesh, Haryana Hotels

भोपाळ : मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला. येथील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून व्युहरचना करण्यात येत आहे. त्यासाठी आमदार फोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे, तसा आरोप करण्यात आला आहे. याआधी कर्नाटक आणि गोवा राज्यात भाजपने आमदार फोडत काँग्रेसला दे धक्का देत आपले सरकार स्थापन केले आहे.

आता मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी हालचाल सुरु केली आहे. तसा काँग्रेसने थेट आरोपही केला आहे. त्यामुळे भाजपचे सत्ता स्थापनेचे नवे मिशन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काँग्रेसने भाजपावर कमलनाथ सरकार पाडण्याचा आणि आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोपही केला. त्यानंतर काँग्रेस पक्ष अलर्ट झाला आणि अखेर मध्यरात्री आमदारांची गुरूग्रामच्या हॉटेलमधून सूटका केली व निःश्वास टाकला.

याआधी, “भाजपाने 8 आमदारांना गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड भारत या हॉटेलमध्ये ओलीस ठेवलंय. कमलनाथ सरकारचे मंत्री जीतू पटवारी आणि मंत्री जयवर्धन सिंह ओलीस ठेवलेल्या आमदारांची सूटका करण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचलेत, पण त्यांना आमदारांची भेट घेऊ दिली जात नाहीये. हॉटेलमध्ये सुरक्षेसाठी हरयाणा पोलिसांना तैनात करण्यात आलंय. ओलीस ठेवलेल्यांमध्ये चार आमदार काँग्रेसचे, दोन आमदार बहुजन समाज पक्षाचे, एक आमदार समाजवादी पक्षाचा आणि अन्य एक आमदार अपक्ष आहेत”, असा आरोप आजतक या वृत्तवाहिनीसोबत बोलताना मध्य प्रदेशचे अर्थ मंत्री तरुण भनोट यांनी केला. त्यानंतर ते स्वतःही आमदारांची भेट घेण्यासाठी गुरुग्रामच्या आयटीसी हॉटेलकडे निघाले.

दिग्विजय सिंह यांनी भाजपवर सरकार अस्थिर असल्याचा आरोप केला. हरियाणामधील भाजप सरकारमुळे भाजप नेत्यांनी हे हॉटेल निवडलं. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय गोंधळ उडाला आणि भोपाळ ते दिल्ली आणि गुडगावपर्यंत गोंधळ उडाला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार हरयाणातील हॉटेलमध्ये रातोरात लपविण्यात आले होते. त्यावेळी देखील असाच गोंधळ झाला होता.

अजित पवार यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि २० मंत्रिपद देण्याची ऑफर भारतीय जनता पक्षानं दिली असल्याची माहिती त्यावेळी प्रसार माध्यमांनी दिली होती. पण, चंबळच्या डाकूंसारचा भारतीय जनता पक्ष वागत असल्याचा आरोप त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. त्यावेळी देखील राष्ट्रवादीच्या आमदारांना गुरगावमधील हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. बहुमत होतं तर दरोडेखोरी करण्याची गरज काय होती असा आरोप फडणवीसांवर करण्यात आला होता.

‘गुडगावच्या एका हॉटेलमध्ये ११७ रुम नंबरमध्ये राष्ट्रवादीच्या त्या ३ आमदारांना ठेवण्यात आलं होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं. तिथे या आमदारांना कोंडून ठेवलं होतं. त्यांच्यासाठी हरयाणाचे पोलीस आणि गुंड लोकं ठेवले होते असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसाच प्रकार पुन्हा मध्य प्रदेशातील सरकार पडताना होतो आहे आणि त्यात हरयाणातील हॉटेलचा पुरेपूर वापर होताना दिसत आहे.

 

News English Summery: Earlier, the BJP had reserved 8 MLAs at the ITC Grand Bharat Hotel in Gurugram. Minister for the Kamal Nath Government Jitu Patwari and Minister Jayawardene Singh arrive at the hotel to rescue the MLAs who have been promoted, but they are not allowed to visit the MLAs. Haryana police have been deployed for security at the hotel. Of those who have been elected, four MLAs belong to the Congress, two to the Bahujan Samaj Party, one to the Samajwadi Party and the other one to the Independent, “Finance Minister Tarun Bhanot said. He then proceeded to Gurugram’s ITC Hotel to meet the MLAs themselves.

 

Web News Title: Story Haryana Hotels are most favor of BJP party during any operation Lotus.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x