आमदार विद्या चव्हाण यांना सुनेकडून प्रत्युत्तर, विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता..
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा आरोप केला आहे. यावर विद्या चव्हाण यांची सून पुढे आली असून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपले विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा मी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा विद्या चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करुन बदनामी करण्याची धमकी दिली होती. आता त्यांनी नेमकं तेच केलं आणि माझ्याविरोधात कट रचला, असा आरोप विद्या चव्हाण यांच्या सुनेनं केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, ‘मला मुलगा झाला नाही म्हणून ते कुटुंबीय माझा छळ करायचे. माझ्या दीराने माझा मानसिक छळ केला आहे. मात्र मी आता गप्प बसणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला घराबाहेर काढलं आणि माझ्या लहान मुलीपासून वेगळं केल्याचं त्यांनी सांगितलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हा दावा केला आहे.
“मी १६ जानेवारी रोजी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यानंतर २२ जानेवारी रोजी डिवी केस दाखल केली. स्वत:वरील आरोप मागे घेण्यासाठी ते माझ्या मुलीचाही वापर करत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला आहे. “सध्या मला कौटुंबीक न्यायालयानं मुलीला १ ते ६ दरम्यान भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यापूर्वी मला तिच्याशी फोनवरही बोलू दिलं जात नव्हतं. ज्या व्यक्ती महिलांच्या प्रश्नांसाठी लढतात त्यांनीच माझ्यावर असा अन्याय केला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
तात्पूर्वी, सूनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य काही बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलानं यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्कदेखील साधला होता,” अशी माहिती चव्हाण यांनी दिली होती.
विलेपार्ले गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच विद्या चव्हाण यांनी आपल्यासह कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेनं १६ जानेवारीला तक्रार दिली होती. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि इतर सदस्यांविरोधात कलम ४९८ ए, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
News English Summery: Vidya Chavan, a senior leader of the NCP, is accused of harassing Sune. Meanwhile, Vidya Chavan has accused Sunay of having an extramarital affair. Vidya Chavan’s daughter-in-law has come forward and has reacted to this. He said the allegation of having an extramarital affair was false. When I filed a complaint to the police station about this, Vidya Chavan’s family had threatened to collect evidence against me and defame. Now he has done exactly that and has conspired against me, says Vidya Chavan. Later, she said, ‘I didn’t have a son so the family would harass me. My soul has persecuted me. But after they realized that I would not be silent anymore, they took me out and told me to separate from my little daughter. He claimed this while talking to a Marathi news channel.
Web News Title: Story NCP MLA Vidya Chavan’s daughter in law response to extramarital affair statement.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार