22 November 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

जेट एअरवेजचे माजी CEO नरेश गोयल यांच्या मुंबईस्थित घरावर ED'ची धाड

Jet Airways, Naresh Goyal

मुंबई: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची बलार्ड इस्टेट कार्यालयामध्ये चौकशी केल्यानंतर त्यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) ताब्यात घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोयल यांना ईडीच्या पथकानं ताब्यात घेऊन त्यांच्या घरी नेले आणि घराची झाडाझडती घेतली. गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले होते. २०१४ मध्ये कऱण्यात आलेल्या या गुंतणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं होतं.

हा छापा टाकण्यापूर्वी ED ने फेमाअंतर्गत (FEMA) कारवाई करीत दिल्ली व मुंबई येथील 12 ठिकाणांचा तपास केला होता. यामध्ये जेट अधिकाऱ्यांच्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे. या तपासादरम्यान नरेश गोयल यांच्या 19 कंपन्यांची माहिती मिळाली होती. यापैकी 5 कंपन्यांची परदेशात नोंदणी करण्यात आली आहे. यासह संशयास्पद व्यवहाराद्वारे परदेशात पैसे पाठवून पैशांचा गैरवापर केल्याची माहितीही मिळाली आहे. ED ने छाप्यादरम्यान परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या व्यवहाराची कागदपत्रे आणि डिजिटल स्वरुपातील पुरावे ताब्यात घेतले आहेत.

प्रसार माध्यमांच्या हाती आलेल्या माहितीनुसार, आता ED ने नरेश गोयल यांच्याविरोधात नवीन केस दाखल केली आहे. ED चे मुख्य अधिकारी बुधवारी रात्री नरेश गोयल यांच्या मुंबईस्थित घरी पोहोचले. तपासादरम्यान ED च्या अधिकाऱ्यांनी नरेश गोयल यांची चौकशी केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात हा छापा टाकण्यात आला होता.

 

News English Summery: Jail Airways founder Naresh Goyal has been taken into custody by the Enforcement Directorate (ED) after an inquiry into the Ballard Estate office. According to sources, Goyal was taken into custody by ED’s squad and taken to his house and taken to the house. A case has been registered against Goel for money laundering. Earlier, the raids were carried out at a total of 12 locations in Mumbai and Delhi. The raids were carried out under a case involving a violation of the Foreign Exchange Law. Investigators say the FDI rules were violated during the 2014 engagement.

 

Web News Title: Story ED raid at Jet Airways founder Naresh Goyal offices in Delhi Mumbai.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x