22 November 2024 7:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

शाळा चित्रपटात ब्राह्मण कलाकार होते; तेव्हा गतीमंद झोपला होता का? आनंद दवे

Film director Sujay Dahake, Brahman Mahasangh Anand Dave

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने केलेल्या विधानावरुन सध्या मराठी मनोरंजन विश्वात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. “मराठी मनोरंजन श्रेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?”, असा सवाल ‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके याने उपस्थित केला. ‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केलं होतं.

त्यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. “ब्राह्मण कलाकारांबद्दल जे वक्तव्य केलंय त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. निव्वळ मूर्खपणाचं हे विधान आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये जातीयता पसरवण्याचे हे उद्योग आहेत. प्रसिद्धीसाठी सुजय डहाकेने हे विधान केलेलं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे,” असे मत दवे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना नोंदवले.

डहाके यांच्या शाळा चित्रपटामध्ये अनेक ब्राह्मण कलाकार होते अशी आठवणही दवे यांनी करुन दिली. “त्याच्या स्वत:च्या शाळा चित्रपटामध्ये अनेक कलाकार ब्राह्मण होते. त्यावेळेस हा गतीमंद माणूस झोपला होता का?,” अशा शब्दांमध्ये दवे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

तत्पूर्वी, “माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे”, असं मत केतकरने त्याच्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केलं होतं.

 

News English Summery: “We strongly condemn the statements made by Brahmin artists. This is a statement of pure stupidity. These are the industries of spreading ethnicity in the field of film. We have a clear statement that Sujay Dahake has made this statement for publicity, ”said Dave, speaking on the issue. Dave also recalled that there were several Brahmin actors in Dahake’s school movie. “In his own school movie many actors were Brahmins. Did the speedy man sleep then ?, ”Dave says in his words.

 

Web News Title: Story Pune Brahman Mahasangh Anand Dave slams director Sujay Dahake.

हॅशटॅग्स

#Film(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x