प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून...? मनसेची टीका
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. अयोध्या दौऱ्यावर जाण्याअगोदर अयोध्येचा इतिहास लक्षात ठेवा, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. यावर संदीप देशपांडेंनी ट्विट केलं आहे. ‘लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले .पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले.असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेंव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी….शुभेच्छा’ असं ट्विट करत टीका केली आहे.
लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले .पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले.असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेंव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी….शुभेच्छा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 6, 2020
उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अयोध्या गेले होते. तेव्हा त्यांनी आपल्यासोबत मुठभर अयोध्येची माती आणली होती. यानंतरच निवडणुक जिंकल्यावर पुन्हा अयोध्याचा दौरा केला होता. तेव्हा ते भाजपचे मित्रपक्ष म्हणून दौऱ्यावर गेले होते. पण आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हा अयोध्या दौरा करणार आहेत.
दरम्यान उद्याच्या अयोध्या दौऱ्याकरीता मुंबई आणि उपनगरांतील शिवसैनिकांसाठी १८ डब्यांची विशेष रेल्वे आयआरसीटीसीच्या माध्यमातून आरक्षित केली होती. लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या आणि परतीचा प्रवास यासाठी हे आरक्षण आहे. ही विशेष रेल्वे गुरुवारी दुपारी १.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार होती. मात्र ती नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे विलंबाने रवाना झाली. आज, संध्याकाळपर्यंत ही गाडी अयोध्येत पोहचेल. शनिवारी रात्री ११.३० वाजता या रेल्वेचा परतीचा प्रवास सुरू होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेनेचे काही पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदार विमान आणि पर्यायी साधनांनी अयोध्येत आज दाखल होणार आहेत. यावेळी मुंबई आणि नाशिक येथून शिवसैनिकांनी दोन विशेष रेल्वे आरक्षित केल्या होत्या.
News English Summery: Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya on Saturday. MNS has now criticized Uddhav Thackeray even after criticizing many before his tour began. MNS leader Sandeep Deshpande tweeted a note to remember the history of Ayodhya before visiting Ayodhya. The development front will be completed for 100 years by the government. On this occasion, Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya on Saturday. Sandeep Deshpande has tweeted this. Remember, Lord Ramachandra kicked the power and ruled for fourteen years at the behest of his father. Doing so has been criticized.
News English Title: MNS Leader Sandeep Deshpane criticized Chief Minister Uddhav Thackeray for his Ayodhya visit
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News