25 November 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

चमकोगिरी कार्यकर्त्यांना डोस; तर 'त्या' प्रामाणिक कार्यकत्याच्या कामाची नांदगावकरांकडून आठवण

MNS Leader Bala Nandgaonkar, MNS Tulsi Joshi

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून केवळ चमकोगीरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या देताना एका कट्टर महाराष्ट्र सैनिकाच्या समाजोपयोगी कामांची आठवण करून दिली आहे. मनसेचे पालघर येथील कार्यकर्ते तुलसी जोशी हे पक्षात नेत्यांइतकेच प्रसिद्ध आहेत. सामान्य लोकांचा मदतीला धावून जाणारा त्यांचा स्वभावाची, स्वतः सामान्य लोकं देखील व्हिडिओच्या स्वरूपात आठवण करून देतात.

अगदी पोलिसांपासून ते सामान्य लोकांपर्यंत तुलसी जोशी मदतीला धावून जातात आणि सामान्य जण माणसात मनसेची प्रतिमा उंचावण्याचं समाजकार्य चिरंतर करत आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर अत्यंत तणावाची स्थिती असताना देखील त्यांनी पालघर’मध्ये शिवसेनेशी दोन हात करत मनसेचा झेंडा आणि कार्यालय खुलं केलं होतं. अगदी त्यावेळी त्यांच्यावर स्थानिक शिवसैनिकांनी मोठा हल्ला देखील केला होता, मात्र ते कधीही डगमगले नाहीत आणि आज तेच स्थानिक शिवसैनिक देखील त्यांचा आदर करतात.

पालघर जिल्हा राजकीय दृष्ट्या पूर्वपणे आरक्षित असून येथे आपल्याला कोणताही राजकीय भविष्य नाही हे माहित असताना देखील ते मनसे आणि राज ठाकरे याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. विशेष म्हणजे ते मूळचे राजस्थानी असल्याचे अनेकांना आजही माहित नाही, मात्र तरी देखील जेथे आपलं आयुष्य घडलं त्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी तुलसी जोशी अत्यंत कडवट विचारांचे आहेत. मनसेतून बरेच आमदार फुटले होते तेव्हा, त्यातील एका आमदाराने यांना पालघरमध्ये आले असताना थेट भाजपमध्ये येण्यासाठी विनंती केली होती आणि काही आमिष देखील दिली होती, मात्र त्यांनी त्यावेळी जे उत्तर दिलं होतं ते अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना माहित आहे.

आज तेच मनसेचे माजी आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत. तुलसी जोशी यांचे अनेक पत्रकारांशी देखील सलोख्याचे संबंध आहेत. मात्र एवढी मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना देखील मनसेने त्यांना पालघर’मध्ये सामान्य कार्यकर्ता बनवून ठेवलं आहे, तर अनेक कुचकामी नवखे मोठ्या पदावर बसवले आहेत ही देखील मनसेची स्थानिक पातळीवरील नकारात्मक बाजू अधोरेखित होते. त्यामुळे अशा कार्यकर्त्याची बाळा नांदगावकर यांनी समाज माध्यमांवर आठवण काढल्याचं पाहायला मिळत आहे.

काय म्हटलं आहे बाळा नांदगावकर यांनी तुलसी जोशींबद्दल;

तुलसी जोशी – कट्टर महाराष्ट्र सैनिक

आपल्या पक्षात अनेक कार्यकर्ते हे कायमस्वरूपी जनतेच्या हाकेला धावून जाणारे असे आहेत. पालघर येथील तुलसी जोशी हा असाच एक कट्टर महाराष्ट्र सैनिक. कुठेही अन्याय, फसवणूक झाली तर सर्वात प्रथम आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते हे मदतीला जात असतात. परंतु अजूनही ही केलेली जनसेवा लोकांपर्यंत पूर्णपणे पोचतच नाही. ज्यांना लोकांनी सत्ता दिली ते सत्तेच्या नशेत मग्न असतांना तुलसी हा अशा अनेक लोकांना त्याच्या पद्धतीने न्याय देत असतो. आजकाल सोशल मीडिया मुळे ह्या गोष्टी आता लोकांपर्यंत हळूहळू पोचताय हे त्यातल्या त्यात बरे. मनसे चा कोणताही जाहीर कार्यक्रम असो सर्वात पहिले नजरेस पडतो तो उत्साही तुलसी. कायमच आपल्या पक्षाची भूमिका पुढे घेऊन जात असतो. “एक कॉल आणि मॅटर सोल” ही त्याची पंचलाईन सुद्धा लोकप्रिय होत चालली आहे . नुकतीच त्याने माने नामक पोलीस बांधवास सुद्धा अशीच मदत केली.तसेच अनेक ईतरही लोकांना तो यथाशक्ती मदत करतच असतो. इतर कार्यकर्ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चमकोगिरी करत असताना आपल्या पक्षातील अनेक कार्यकर्ते हे अशाप्रकारे जनतेच्या सेवेत कायम असतात तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता. हीच तर आपल्या राजसाहेबांची शिकवण आहे. असेच लोकोपयोगी काम करत राहू यात, एकदिवस जनता नक्कीच दखल घेईल…..आपला नम्र…… बाळा नांदगावकर

 

News English Summery: Many activists in our party are permanently out of the public eye. Tulsi Joshi from Palghar is one such strong Maharashtra soldier. Wherever there is injustice, fraud is the first thing that our own party workers are doing. But the public service still does not reach the people. While the people who are in power are intoxicated with power, Tulsi is the one who judges such people in his own way. Nowadays, with social media, things are slowly spreading to the people. The first thing that comes to mind is any public event of MNS, the enthusiastic Tulsi. Always taking on the role of your party. Its punchline “One Call and Matter Soul” is also gaining popularity. He recently assisted a policeman named Mane. He is helping as many other people as possible. While many other party workers are shining their eyes in front of the election, many of the party workers in their party remain in the service of the public without any expectations. This is the teaching of our king. The public will surely notice that one day we will continue to do such work says MNS Leader Bala Nandgaonkar.

 

Web News Title: Story MNS Senior Leader Bala Nandgaonkar appreciate party worker Tulsi Joshi for his social work contribution .

हॅशटॅग्स

#TulsiJoshi(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x