24 November 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

YES Bank: सीतारामन यांना एकूण वाटतं अजून युपीए'च सत्तेत आहे - चिदंबरम

P Chidambaram, YES Bank Crisis, SBI Bank, Nirmala Sitharaman

नवी दिल्ली: आजारी येस बँकेला मदत करण्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयावर वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शंका उपस्थित केली आहे. येस बँकेची या संकटातून सुटका करण्यासाठी एसबीआयला हुकूम देण्यात आल्याचे माझे मत आहे असे चिदंबरम पत्रकार परिषदेत म्हणाले. चिदंबरम म्हणाले, “येस बँकेचे लोन बुक २०१४ ते २०१९ च्यादरम्यान पाच पटीने वाढले. २०१४ मार्चमध्ये लोन बुक रक्कम ५५ हजार कोटी रुपये होती, त्यामध्ये मार्च २०१९ मध्ये वाढ होऊन २ लाख कोटीहून अधिक झाली. फक्त दोन वर्षांत ९८ हजार कोटींची वाढ होऊन २ लाख कोटींपेक्षा जास्त झाली.

पुढे ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे एलआयसी स्वेच्छेने आयडीबीआय बँकेची सुटका करण्यासाठी तयार नव्हती, तसेच एसबीआय सुद्धा येस बँकेच्या सुटकेसाठी स्वेच्छेने तयार आहे असे मला वाटत नाही. एसबीआयला तसे निर्देश देण्यात आले आहेत” असे चिदंबरम म्हणाले. आर्थिक संस्थांमध्ये भाजपा सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

“कुठल्याही आर्थिक संकटाच्याकाळात बाजारच सर्व काही सांगून जातो. काल सेन्सेक्स ८८४ अंकांनी कोसळला. एसबीआयच्या शेअरचा भाव १८ रुपयांनी तर, येस बँकेच्या शेअरचा भाव ३६.८ रुपयांवरुन १६ रुपये झाला” असे चिदंबरम म्हणाले.

दरम्यान, YES बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आता भारतीय स्टेट बँक पुढे सरसावली आहे. एसबीआयचे चेअरमन रजनिश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एसबीआय YES बँकेत तब्बल २४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं. तसेच, एसबीआय YES बँकेत ४९ टक्के गुंतवणूक करु शकते, असंही त्यांनी सांगितलं.

 

News English Summery: Senior Congress leader and former finance minister P Chidambaram on the State Bank of India’s decision to help the ailing Yes Bank. Chidambaram has raised doubts. Chidambaram told a press conference that SBI has been ordered to relieve Yes Bank from the crisis. Chidambaram said, “Yes Bank’s loan book increased five times between 2014 and 2019. Loan book amount was Rs 55,000 crore in March 2014, of which it increased to more than Rs 1 lakh crore in March 2019. Meanwhile, the State Bank of India has now stepped in to rescue YES Bank from the financial crisis. He also said that SBI will invest around Rs 2450 crore in YES Bank, and that SBI can invest 49 percent in YES Bank.

 

Web News Title: Story YES bank crisis P Chidambaram says when I listen Nirmala Sitharaman feels UPS in Power.

हॅशटॅग्स

#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x