शिवसेनेकडून 'ते' १ कोटी निधी संदर्भातील ट्विट डिलीट? सविस्तर वृत्त
अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटीचा निधी देण्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्याबतात काल अधिकृत ट्विट देखील शिवसेनेच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंच्या कालच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भातील सर्व ट्विट तसेच असून, केवळ १ कोटी निधीच्या संदर्भातील ट्विट डिलीट करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. संबंधित ट्विट का हटविण्यात आलं याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र असं नेमकं काय घडलं की शिवसेनेला केवळ १ कोटीच्या निधी संदर्भातील ट्विट डिलीट करावं लागलं आहे. विशेष म्हणजे ते ऑफिस ऑफ उद्धव ठाकरेंच्या ट्विटर हँडलवर देखील उपलब्ध नसल्याने काही बिनसलं आहे का अशी शंका व्यक्त केली जातं आहे.
काय होतं ते नेमकं ट्विट आणि त्याची लिंक;
“हमारे मराठी में एक कहावत है, ‘फुल न फुलाची पाकळी’। में नम्रतापूर्वक कहना चाहता हूं सरकार की ओर से नहीं, हमारे ट्रस्ट की ओर से १ करोड़ रुपए की राशि में मंदिर निर्माण के लिए घोषित करता हूं।”
-शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/RxHrxjhPgM
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) March 7, 2020
दरम्यान, यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, “लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त १ करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी दिले असल्याचा खोचक टोला निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.
लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी??? pic.twitter.com/XNCJEvWK6V
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 7, 2020
News English Summery: At this time, Chief Minister Uddhav Thackeray himself announced to give Rs 1 crore funding from Shiv Sena for the construction of Ram temple and official tweet was also announced from Shiv Sena’s Twitter handle. However, all the tweets regarding Uddhav Thackeray’s visit to Ayodhya yesterday, as well as the tweet regarding the Rs 1 crore fund, have been deleted. No further details have been revealed as to why the related tweet was deleted. However, what happened was that the Shiv Sena had to delete the tweet with reference to the funding of only 1 crore. Notably, it is not even available on the Twitter handle of the Office of Uddhav Thackeray, suspecting that something is wrong.
Web News Title: Story Shivsena deleted twit regarding donation given to Ram Mandir Nirman yesterday during CM Uddhav Thackeray tour of Ayodhya.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार