मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'युवासेना Mock CET' संकेतस्थळाचं अनावरण - सविस्तर वृत्त
मुंबई: आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर युवासेनेच्या आधुनिक संकल्पनेवर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. महापालिकेत देखील यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबर इतर ऑनलाईन सर्व्हिस पुरवठादारांच्या सहाय्याने इंजिनियरिंग, फार्मासी, मेडिकल तसेच लॉ अभ्यासक्रमाच्या म्हणजे CET मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी ‘ऑनलाईन मॉक-टेस्ट’ यंत्रणा उभी करण्यावर युवासेनेने काम सुरु केलं आहे.
CM Uddhavsaheb Thackeray launched the poster and website https://t.co/FeUlxPkBx9 for the 4th edition of ‘Yuva Sena Mock CET’
This exam will involve mock CETs for Engineering, Pharmacy, Medical and Law having exam centres in every Taluka and City of Maharashtra.@OfficeofUT pic.twitter.com/f7XYL9kKpD
— Varun Sardesai (@SardesaiVarun) March 5, 2020
विशेष म्हणजे यामध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लक्ष घातल्याने युवासेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते युवासेनेने ‘युवसेना Mock CET’ वेबसाईचं अनावरण देखील केलं आहे. या उपक्रमासाठी त्यांनी खाजगी सर्व्हिस पुरवठादारांची देखील मदत घेतली आहे. एकूणच शिवसेना एका आधुनिक स्वरूपात घेऊन जाण्यावर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा भर दिसत आहे आणि त्यानुषंगाने योग्यती पावलं देखील टाकण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसेच्या महाधिवेशनात अमित ठाकरेंनी मांडलेल्या प्रस्तावात आधुनिक शिक्षणाचा आणि स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन यंत्रणा उभी कारण्याबाबत उल्लेख होता. त्यानंतर सर्व विषय ‘जैसे थे’ असला तरी युवासेना याबाबत थेट पावलं टाकत पुढे निघून जाताना दिसत आहे. त्यामुळे एखादा विषय आपण मनापासून मांडतो, पण त्यात पॅशन आणि झोकून देण्याचा मानस नसेल तर सर्वच अधांतरी राहतं याचा मनसेच्या पुढच्या पिढीच्या बाबतीतही पुन्हा प्रत्यय येण्याची शक्यता आहे. कारण मनसे विद्यार्थी सेनेचे काही मोजके पदाधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, त्याच उत्तम उदाहरण म्हणजे लातूरमध्ये करण्यात आलेला प्रयोग म्हणता येईल. मात्र मनसेतील वरिष्ठ त्यांना तंत्रज्ञानाची कशी मदत होईल यावर जराही काम करताना दिसत नाहीत आणि जी मदत होते ती केवळ उदघाटनाची रिबीन कापण्यापुरतीच मर्यादित असते हे देखील वास्तव आहे.
शिक्षकांचं मार्गदर्शन, यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती, पालक-विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तरे अशा सकारात्मक वातावरणात लातूरमध्ये NEET-JEEE च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं शिबीर. मनविसे जिल्हाध्यक्ष श्री. किरण चव्हाण ह्यांचं उत्तम आयोजन आणि स्तुत्य उपक्रम. #विद्यार्थ्यांचामनसेआवाज pic.twitter.com/NNs6xxGW98
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 5, 2020
News English Summery: Aaditya Thackeray took charge of the ministry, he has also focused on the modern concept of the Yuvasena. Municipal corporation is also seeing the beginning of international quality education from this year. In addition to this, the youth has started work on setting up an ‘online mock-test’ system for preparation of examinations for engineering, pharmacy, medical and law courses CET with the help of other online service providers. Significantly, the Chief Minister Uddhav Thackeray himself has also taken into consideration the confidence of the young army. In this regard, the Chief Minister has launched the Yuva Sena Mock CET website. He has also sought the help of private service providers for this initiative. Overall, Aditya Thackeray’s youth force seems to be taking on the Shiv Sena in a modern way and it has been seen that the qualifications have been put in place.
Web News Title: Story Yuva Sena launched Yuvasena Mock CET website for CET exam preparation.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार