22 November 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

भुजबळ म्हणाले; राज ठाकरेंनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी...पण का? - सविस्तर

Milind Ekbote, Bhima Koregaon Riots, Raj Thackeray, Chhagan Bhujbal

मुंबई: कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकबोटे यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणे स्वागतार्ह आहे. त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, असे एकबोटे यांनी म्हटले.

दरम्यान, राज ठाकरे आणि मिलिंद एकबोटे यांच्या भेटीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, राज ठाकरे हे राजकारणी असल्याने त्यांना कोणालाही भेटण्याचा हक्क आहे. मात्र, आपण काय भूमिका घेत आहोत, हे कळण्याइतकी समज त्यांच्याकडे आहे. त्यांनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी, असे भुजबळ यांनी म्हटले.

तत्पूर्वी, १ जानेवारीला विजय दिनाच्या दिवशी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली होती. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४नुसार जमावबंदी लागू करण्यात आलं होतं. दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकीय दृष्ट्या हे प्रकरण अत्यंत संवेदन असताना राज ठाकरेंनी त्यांना भेट दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

 

English News Summery: Meanwhile, NCP leader Chhagan Bhujbal spoke about the visit of Raj Thackeray and Milind Ekbote. He said that since Raj Thackeray is a politician, he has the right to meet anyone. However, they have the understanding to know what role we are taking. Bhujbal said that he should remember the teachings of Grand father Prabodhankar Thackeray.

 

Web News Title: Story Minister Chhagan Bhujbal reaction over Milind Ekbote and Raj Thackeray meet in Mumbai.

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x