तू कुठे आहेस ??
ये सांग ना आहेस कुठे तू?? मला तू दिसत नाहीयेस.. कुठे आहेस तू?? नको ना अशी सतवू. ये ना अशी समोर कधी बघून मला कधी पापण्यांनी ओशाळ…वाचते आहेस ना तू ?? तुझ्यावर बघ मी काय काय लिहिले….तुला आवडत माझ लिहीण म्हणून आणि तू बसलीयेस अशी रुसून…सांग ना काही चुकले का माझे… का आता मला तुझ्यावर काहीच नाही सुचत… माझ्यात असूनही तू मला का कुठेच नाही दिसत…बोल ना काहीतरी काय झालंय… विचार ना कधी कसा आहेस??… जेवलास का आज तरी वेळेत काय बनवलं होतस जेवायला….माझी खूप इच्छा आहे रे तुझ्या हातच जेवण खायची …. भरवशील ना मला तुझ्या हाताने…. बोल ना रे… भरवशील ना??हट्ट कर ना तू…का अशी शांत बसलीयेस… भांड ना माझ्याशी…रागव ना मला… काळजी घे ना माझी… आता रुसवा सोड ना…!
तुझी खूप आठवण येते ग… सांग ना का गेलीस अशी मला एकट सोडून… का ?? तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी तुला माहितीये
तरी का… का मला एकट सोडलस… हे जग बघ मला छळायला लागलंय…मला विचारतंय काय रे काय झालं एव्हडा दुखी का आहेस
काही प्रोब्लेम आहे का… इतक्या वर्षात एव्हडा इमोशनल लिहिलेलं तुला कधी पहिले नाही… या दिवसात तुझे दुखी शब्द सरळ मनावर जखम करतायेत का इतका निराश झालायेस तू… बोल रे काही.. तुझे मित्र / मैत्रिणी आहोत आम्ही घरच्यांशी तू या विषयावर नाही बोलणार कमीत कमी आम्हाला तरी सांग रे काय झालंय तुला
का आम्हालापण तुझ्या दुखा पासून दूर करतोय… तू नाही सांगितलेस तरी सध्या तुझ्या शब्दांमधून कळतंय तुझ्या कवितेत आम्हाला थोडस दुःख जाणवतं…कोणालातरी हरवल्या सारखं किवा समोर असून जे आपल्याला सापडत नाही आहे आणि त्याचा विसर पडावा म्हणून तू घेतलेला शब्दांचा आधार कळतोय रे आम्हाला पण तो तुला जास्त छळतोय… सांग ना काय झालंय प्रेमात कोलमडून पडलास का?? तोल गेला का तुझा??बोल रे कधी तरी मनातलं काही विचारले का एखाद्या तळ्यातल्या ध्यानस्थ बगळ्यासारखा शांत बसतो…काय झालंय काहीही कळायला मार्ग नाही… मित्र तू जास्त बनवत नाही ज्यांना बनवतो त्यांना जवळ करत नाही…मैत्रिणींशी मर्यादेतच बोलतो ते पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची एका वाक्यात उत्तरेच देतोस…
स्वताहून तू काही विचारात नाही आणि बोलत तर अजिबात नाही… एव्हडा शांत कसा रे तू राहू शकतोस… फेसबुक, ओर्कुटवर दुनियाभरच्या लोकांची अपडेट वाचत राहतोस… तुझे करत राहतोस चाट रूम मध्ये बोलतोस तर बोलतो ते पण कोणी बोललं तर नाही तर आहेच तुझ्या स्मायली…नाही तर चारोळी…ग्रुप चाट मध्येही नाही नाही ते बोलतोस… समोरच्याला वाटत बिनधास्त… मन मोकळे व्यक्तीमत्व आणि काहीसे घमंडी, स्वत मधेच रमलेल… त्यांच्यासाठी कधी जोकर बनून…कधी लहान बनून…थोडा वेळ करमणूक करून येतोस… आणि नंतर तीच शून्यात हरवलेली नजर… पाणावलेले डोळे…आणि भिजलेला तू… येव्हड तुला बोलत आहोत तरी तू शांत… अरे बोल ना काही इतका कसा रे दगड तू… काही जाणीवच नाही का तुला…??
“आपल्याला जे हवे असते ते कधीच पाहिजे त्या वेळेवर मिळत नाही
आणि जेव्हा वेळ निघून जाते आणि ती गोष्ट घडते त्याला अर्थ राहत नाही……”
“आपल्या मनासारखं कधी होत नाही
कधी होईल याची खात्री पण असत नाही……”
सांग आता तू काय उत्तर देवू मी ?? तुझ्या बद्दल कस अन काय सांगणार मी… तुटलेल्या स्वप्नाची कहाणी कोणत्या शब्दांनी सांगणार मी?? लिहीण सोडायचा विचार कितीदा ठाम केलेला मी…अगदी शेवटचंच लिहून ब-याचदा निरोपही घेतला शब्दांतून…पण तूला कोरे कागद पहिलेच जात नाही माझे… अगदी माझ्या मनातल्या शब्दांतून तू कागदावर उमटतेस…कधी भर भरून प्रेम करतेस तर कधी राडाच करतेस… पण माझ्या सोबत असतेस….शरीराने नसली तरी मनानी… अबोल असलीस तरी बोलक्या शब्दांनी… तुझ्या-माझ्या आठवणींच्या ओल्या थेंबांनी… तू असतेस सोबत माझ्या… खर तर आता कवितेच्या तकरारींनीच आहेस सोबत अजूनही…शब्दांत बांधून ठेवलेली तुझी आठवण…. माहित नाही तू वाचत आहेस का नाही हे लिहिलेले… वाचत असशील तर तुला देयची आहे ही आठवण फक्त तुझ्यासाठी लिहिलेली तुझ्यासाठी बनवलेली… माझ्या मनातली तुझ्या कल्पनेत नसलेली एक भेट…
आवडली तर सांग…
तसही माझ लिहीण सध्या खराब होत चाललंय सॉरी… या दिवसात तुला बराच मिस केल… काय करत असशील ठीक असशील का नाही….अन काहीच नाही… दिवस माझा तुझ्या नावाने सुरु होतो आणि संपतोही आहे… एक क्षण फक्त कुठे तरी हरवला आहे…तुझ्या स्वप्नात जगलेला अन स्वप्न म्हणूनच तुटलेला…तरी पुन्हा जगायला हवाहवासा वाटणारा एक “क्षण”… रोजच तुटाव वाटणारं एक स्वप्न…कारण शांत राहून मी तुझ्या सोबत असतो तू सोबत असल्यावर मला अजून कोणी-कोणीच नाही लागत…तू आहेस ना माझ्याशी बोलायला….माझ्या बोलण्यापेक्षा माझ शांत राहाण ऐकायला… तुझ्यासारख माझ शांत राहाण कुणालाच नाही समजत म्हणून कुणाशी काही बोलाव वाटतच नाही… बोलून काही कळण्यापेक्षा न बोलता काहीही न कळलेलं चांगल… तेव्हडीच तू आणखी जवळ येशील…माझा अबोला सोडवायला… येशील ना आता तरी अगदी शेवटच अन कायमच… फक्त माझ्या जवळ…मला माहितीये कदाचित पूर्वीसारख तुझ्या माझ्यात काही नसेलही…पण…
माझ्या पावलांशी पावले मिळवत तू असल्यावर काय हवं
माझ्या हातात तुझा हात असल्यावर मला आणि काय हवं…
उद्याच्या चिंतेत न जगता आज मध्ये जगल्यावर काय हवं
तुझ्याच मिठीत काही क्षण विसावल्यावर आणि काय हवं
काही क्षण स्वप्नाच्या पलीकडे जगल्यावर आणि काय हवं
तुझ्या मिठीत शेवटचा श्वास घेतल्यावर मला आणि काय हवं…. आणि काय हवं …. आणि काय हवं …
लेखक: पियुष खांडेकर
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या