पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच; शिवसेनेकडून मनसेची खिल्ली
मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.
महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. ‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले, असं म्हणत शिवसेनेने मनसेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून मनसेवर टीका केली.
‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले. पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता, अशी टोलेबाजीही अग्रलेखात करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे मनसेवर टीका केली होती. शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतला आहे जो १४ वर्ष कधीही प्रकाशात आला नाही, कुठलाही प्रकाश पाडू शकला नाही. आंदोलने करायची आणि अंधारात सेटलमेंट करायची हे रात्रउद्योग जनतेने गेली अनेक वर्ष पाहिलेले आहेत. त्यामुळे याचा काडीमात्र प्रभाव जनतेवर पडणार नाही, हे मात्र निश्चित, असे म्हणत सचिन सावंत यांनी मनसेवर निशाणा साधला होता.
News English Summery: The concept of the Shadow Cabinet of MNS has been removed from the foreword in the ‘match’ which is the mouthpiece of the Shiv Sena. The foregoing states that the current shadow cabinet experiment in Maharashtra or in the country should not be a dramatic use of the Shadow Cabinet. Not just the official opposition party in the Lok Sabha. The opposition in the state is not yet ready to step down. When announcing the Shadow Cabinet, their key leaders had to tighten up the Shadow Cabinet, to be careful, not to do blackmail. It’s fine. Shiv Sena has said that experience teaches wisdom to a person. In view of the current state of opposition in Maharashtra or in the country, the experiment of ‘Shadow’ cabinet means that this game should not be used as a shadow ‘, said MNS chief Raj Thackeray. In particular, the mention of MNS and Raj Thackeray has been avoided in the entire foreword.
News English Title: Story Shivsena criticized MNS over formation of Shadow cabinet through Saamana Newspaper.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार