23 November 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता
x

राज्यातील मिशन 'अजित पवार' अनुभवामुळे भाजपाला मध्यप्रदेशात धाकधूक - सविस्तर वृत्त

Madhya Pradesh, scindia quits congress, Amit Shah

भोपाळ, १२ मार्च : मध्यप्रदेशमधील २२ पैकी १३ बंडखोर आमदार काँगेसला सोडचिठ्ठी देणार नसल्याचा दावा पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला आहे. विधानसभेत कमलनाथ सरकार विश्वासदर्शक ठराव निश्चितच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आम्हीही गप्प बसलेलो नाही किंवा झोपा काढत नसल्याचेही ते म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमधून बाहेर पडले, त्याचप्रमाणे त्या राज्याच्या विधानसभेतील २२ काँग्रेस आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे राज्यपालांकडे पाठविले आहेत.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर दिग्विजयसिंह म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने दाखविली होती. मात्र, त्याऐवजी आपल्या निष्ठावंताला हे पद द्यावे असे ज्योतिरादित्य यांचा आग्रह होता. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, आता अतिमहत्त्वाकांक्षी नेत्याला नरेंद्र मोदी-अमित शहा हेच कॅबिनेट मंत्रीपद देऊ शकतात असे ते म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदाराला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. पण हे आश्वासनही पूर्ण करण्यात आले नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेल्या केवळ ७ जणांना मंत्रिपद देण्यात आले. उर्वरित सर्व मंत्रिपदे कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्या समर्थक आमदारांना देण्यात आली. तेथील सरकारमध्ये एकूण २८ मंत्रिपदे आहेत.

दरम्यान, भाजपने असं असूनही काँग्रेस सरकार अस्थिर आहे, अल्पमतात आहे अशी ओरड अद्याप केलेली नसून तसा सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी देखी पुढे सरसावल्याचे दिसत नाही आणि त्याच मूळ कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या अनुभवानंतर भाजप कोणतंही पाऊल टाकताना हजारवेळा विचार करत आहे. दुसरं म्हणजे फुटलेले आमदार उद्या काँग्रेसच्या अमिषाला देखील बळी शकतात आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजकीय फायदा होण्यासाठी ते स्वतःची आमदारकी वाया घालावतील असं देखील गृहीत धरून चालणार नाही. त्यामुळे काँग्रेस देखील शांत बसणार नाही याची भाजपच्या वरिष्ठांना कल्पना आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी काही आमदार आपल्या पाठिशी आहेत, असा दावा करत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी केली. या पाठिंब्यावर रात्रीत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आणि शपथविधीही झाला. पण अजित पवार यांनी दावा केला, तेवढे आमदार काही भाजपला येऊन मिळाले नाहीत. आवश्यक आमदारांचं बळ देऊ शकले नाहीत आणि भाजप सरकार अवघ्या दोन दिवसात कोसळलं.

मध्य प्रदेश विधानसभेत सद्यस्थितीत बहुमतासाठी ११५ जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता हे गणित बदलणार आहे. काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ९९ वर येणार आहे. भाजपला १०७ जागा मिळाल्या आहेत. आता २२ आमदारांचा राजीनामा मंजूर झाला तर २०६ आमदारांचीच विधानसभा राहील. त्यामुळे बहुमताचा आकडा १०४ वर येईल. भाजपकडे १०७ आमदार आहेत. म्हणजेच सहज ते बहुमत चाचणी पार पाडतील.

मध्य प्रदेशात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी किंवा भाजपाची खोड मोडण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून कमलनाथ थेट टोकाचा मास्टरस्ट्रोक खेळू शकतात, असा काही राजकीय विश्लेषकांचा तर्क आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिला तर मध्य प्रदेश विधानसभा विसर्जित होऊ शकते. तसं झालं तर मध्यावधी निवडणुकीला पर्याय उरणार नाही.

ज्योतिरादित्य यांचे समर्थक आमदार मुख्यतः ग्वाल्हेर भागातले आहेत. इथे भाजपच्या नेत्यांचंही वर्चस्व आहे. त्यामुळे निवडणुकांच्या आधीच पुन्हा भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून येऊ शकते. त्यातून फोडाफोडीही अटळ असेल आणि दोन्ही पक्षांना ती परवडणारी नाही. म्हणूनच कदाचित भाजपने मध्य प्रदेशात अद्याप तरी सावध पवित्रा घेतला आहे.

 

News English Summery: In Madhya Pradesh, politics has shifted for the past few days. Jyotiraditya Shinde, the big leader, has joined the BJP, pushing the ruling Congress. 21 Jyotiraditya supporters have also resigned. Now the Kamal Nath government in Madhya Pradesh is in the minority. Although Jyotiraditya officially joined the party, the BJP in Madhya Pradesh has not yet claimed the power. You do not even have the number of MLAs announced. This shows that the central leadership of BJP has not forgotten yet the rebellion by Ajit Pawar, which has backed the Fadnavis government in Maharashtra and the reverse. NCP’s Ajit Pawar joined hands with BJP’s Devendra Fadnavis in November, claiming that no party had a majority in Maharashtra. The support was claimed overnight and there was an oath. But Ajit Pawar claimed, so few MLAs did not come to BJP.

 

Web News Title: Story BJP Party Conscious on power claim in Madhya Pradesh Amit Shah remembers Ajit Pawar case even as Jyotiraditya Scindia enters BJP.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x