शिवभोजन योजनेतील हॉटेलचालकांची बिलं लटकली; सरकारी काम आणि....
अहमदनगर, १२ मार्च: महाविकास आघाडी सरकारकडून गोरगरिब जनतेसाठी २६ जानेवारीपासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये जनतेला १० रूपयांमध्ये पोटभर जेवण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात दिली होती. सुरूवातीच्या टप्प्यात शिवभोजन योजनेची ५० केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं आणखी केंद्रे वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान निरनिराळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं होतं.
“आमच्या सरकारने असं ठरवलं आहे की गोरगरिबांना १० रुपयांमध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत.”
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/ZBoHJSrpLf— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 21, 2019
राज्यात सत्ता आल्यास भुकेल्यांना १० रुपयांत भोजन देण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. शिवसेनेचे हे आश्वासन सोशल मीडियावर विनोदाचा विषय ठरले होते. मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० रुपयांत थाळीबाबत दिलेले आश्वासन पाळले आणि राज्यात १० रुपयात थाळी देण्याची घोषणा विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली होती.
गोरगरीब, गरजू लोकांसाठी शासनाने दहा रूपयांत शिवभोजन सुरू केले खरे, मात्र ही योजना सुरू झाल्यापासून शिवभोजन हॉटेलचालकांचे बिलच अदा झालेले नाही. त्यामुळे गरजूंना दहा रूपयांत जेऊ घालणारे हॉटेलचालक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उपाशी राहण्याची वेळ आली आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत १० रूपयांत जेवण मिळणार आहे. उर्वरित ४० रूपयांची रक्कम हॉटेलचालकांना शासनाकडून मिळणार आहे.
नगरमध्ये १० ठिकाणी ही योजना राबवली जात असून प्रतिसाद पाहता शासनाने ताटांची संख्या दुपटीने वाढवून १४०० केली. सर्वच केंद्रांवर उत्तम प्रतिसाद मिळत असून १४०० थाळ्या शिवभोजन लोकांना विनातक्रार मिळत आहे. परंतु या हॉटेलचालकांचे बिलच अद्याप अदा झालेले नाही. पंधरा दिवसांनी हॉटेलचालकांची बिले अदा करावीत, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे निधीही वर्ग झाला आहे.
News English Summery: The Shivbhojan Yojana was launched from January 26 by the Govt. Alliance Government for the poor people. Chief Minister Uddhav Thackeray had informed that the people would be given Rs. In the initial phase, it was announced that 50 centers of Shivbhojan Yojana would be started. He further said that more centers would be expanded in phases. The Chief Minister spoke on various points during his speech. Shiv Sena had in its manifesto promised to provide food to the hungry for Rs. The Shiv Sena’s assertion had become a joke on social media. However, the Chief Minister and Shiv Sena party chief Uddhav Thackeray obeyed the promise of a plate for 10 rupees.
Web News Title: Story hotel operator who gives Shiv Bhojan Thali bills be administered commencement scheme of Mahavikas Aghadi government.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार