22 November 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

अमित ठाकरेंचा औरंगाबाद मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र सैनिकांशी थेट सुसंवाद

Amit Thackeray, MNS Chief Raj Thackeray

औरंगाबाद, १३ मार्च: शिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. काल राज ठाकरे यांचा सकाळचा कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळी शिव जयंतीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादमध्ये मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं एकाप्रकारे हे जोरदार शक्तिप्रदर्शन मानले गेले. परंतु, तत्पूर्वी पोलिसांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर काही अटींवर आणि खबरदारी घेण्याचा सूचना देत परवानगी देण्यात आली.

कोरोना विषाणूमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणार का असा सवाल राज ठाकरे उपस्थित केला होता. आपल्याकडे अद्याप त्याची तीव्रता नाही. ‘पॅनिक’ करण्यासारखं राज्यात घडलेले नाही. लोकांना का घाबरवत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी प्रशासनाला केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवजयंती साजरी होणारच असं स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार ती पार देखील पडली.

मात्र त्यानंतर अमित ठाकरे यांनी मनसेच्या औरंगाबादमधील मध्यवर्ती कार्यालयात स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला आणि त्यांचा अडचणी तसेच मुद्दे समजून घेतले. अमित ठाकरे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधताना, स्वतःच्या पदाची तमा न बाळगता ते कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर बसून संवाद साधत असल्याचं पाहायला मिळालं.

 

News English Summery: Raj Thackeray and Amit Thackeray had arrived in Aurangabad on the occasion of Shiv Jayanti. Yesterday, when Raj Thackeray’s morning program ended, a procession was planned in Aurangabad led by Amit Thackeray on the evening of Shiv Jayanti. In the wake of the municipal elections, the MNS was considered one of the most powerful demonstrators. However, the police had earlier refused permission for the procession of Shiv Jayanti, but later on certain conditions and caution was given. Raj Thackeray had raised the question of whether the Aurangabad municipal elections could be postponed due to the corona virus. You don’t have the intensity of it yet. Nothing like ‘panic’ has happened in the state. Raj Thackeray had asked the administration why he was scaring people. After that, Raj Thackeray had made it clear that Shiv Jayanti would be celebrated and accordingly, it passed. But then Amit Thackeray interacted with local cadres and office bearers at the central office in Aurangabad of MNS and understood their problems and issues.

 

News English Title: Story MNS Leader Amit Raj Thackeray meet party workers face to face at Aurangabad.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x