22 November 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश; ३१ मार्चपर्यंत कलम १४४ लागू

News Latest Updated, Corona Virus, Mumbai Police, IPC 144

मुंबई, १५ मार्च:  मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.

मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे ३२ रुग्ण राज्यभरात आढळले आहेत. मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणीही पॅनिक होऊ नये. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी ‘कोविड १९’ अर्थात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तवली आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत कोणत्याही टूर ऑपरेटर्सना मुंबईतून खाजगी किंवा व्यावसायिक पर्यटनाचे आयोजन करता येणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

राज्यात शनिवारी १३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सध्या १४ जण पुणे येथे, तर ७२ जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे १६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे ९ आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे ३ संशयित रुग्ण भरती आहेत.

 

News English Summery: Section 144 has been implemented in the financial capital of Mumbai after the Corona virus spread to Maharashtra. Accordingly, no kind of mass tourism can be organized in the state, country or abroad from Mumbai. The World Health Organization, the central government and the state government have warned of the outbreak of ‘Covid 19’. Therefore, no tour operators will be able to organize private or commercial tours from Mumbai till March 31, the police have said. Police have been warned to take action against section 144 (mobilization act) if the order is not taken by the Mumbai police. Police orders will be in effect until March 31 at 12 midnight.

 

Web News Title: Story corona virus Mumbai police have decided impose Mob Ban prevent threat corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x