शेअर बाजार कोरोनाच्या धास्तीने कोसळला; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले
मुंबई,१६ मार्च: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. उद्योग- व्यवसायाबरोबरच शेअर बाजारावरही त्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अर्थात सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स २००५ अंकांनी कोसळला असून तो ३२,५५७ अंकावर स्थिरावला आहे. निफ्टीत सध्या ६११ अंकांनी खाली आला आहे. तसेच आशियाई बाजारात पुन्हा एकदा पडझड झाली. याव्यतिरिक्त हाँगकाँग, शाँघाय, टोकियोचे बाजारही सोमवारी चांगलेच गडगडले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी बाजार उघडताच १६८८ अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३२ अंकांनी घसरला. जागतिक बाजारांमध्ये शेअर्सच्या विक्रीचा सपाटा सोमवारीही कायम राहिला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरात कपात केली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचे जगात वेगाने संक्रमण होईल, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम सोमवारी सकाळी भारतीय बाजारांमध्ये दिसला.
वित्तीय सेवा क्षेत्राला आज मोठा झटका बसला आहे. गुंतवणूकदारांनी वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची मोठी विक्री केली आहे. त्यामुळे बीएसई फायनान्स निर्देशांक ७ टक्क्यांनी घसरला. इंडसइंड बँक ११ टक्क्यांनी घसरला आहे. त्याशिवाय मॅग्मा फिनकॉर्प, जेएम फायनान्शिअल, मुथूट फायनान्स, आयसीआयसीआय बँक, उज्जीवन , ऍक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट आदी शेअर जोरदार आपटले आहेत.
News English Summery: Corona virus has spread throughout the world. Industry – As well as business, the stock market is seeing a huge impact. The stock market is seeing a big fall on Monday, the beginning of the week. At the start of the stock market, the Sensex fell by 2005 points to end at 32,557. The Nifty is currently down 611 points. Also, Asian markets fell again. In addition, markets in Hong Kong, Shanghai, Tokyo also fell well on Monday. Meanwhile, the stock market is witnessing a big fall over the past week. The Sensex had lost 3100 points in early trade on Friday. The stock market was jammed for 45 minutes after falling so big. However, the Sensex gained 1,325.34 points to close at 34,103.48 with the market closing at 34103.48. The Nifty was up 433.55 points to close at 10023.70.
News English Title: Story Sensex dropped below 1600 points Nifty also down News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार