22 November 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना धास्तीतही सत्तेचे डोहाळे; MP विश्वासदर्शक ठरावासाठी भाजप सुप्रीम कोर्टात

Madhya Pradesh Politics, Assembly Adjourned, Supreme Court, Kamal Nath

भोपाळ,१६ मार्च: मध्य प्रदेशात ९ मार्चपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य विधानसभेत आजही पाहायला मिळालं. कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट आजही होऊ शकली नाही. उलट कोरोना व्हायरसचं कारण पुढे करत २६ मार्चपर्यंत विधान सभेचं कामकाज स्थगित करण्यात आली. दरम्यान, मुख्‍यमंत्री कमलनाथ यांनी राज्‍यपाल लालजी टंडन यांना भले मोठं पत्र लिहिलं आहे. भाजपने काँग्रेसच्या अनेक आमदारांचे अपहरण केले आहे. आमच्या आमदारांना भाजपने वेठीस ठेवलं असल्याचा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.

विधानसभेत अभिभाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वाक्यांनंतर राज्यपाल लालजी टंडन यांनी सर्वाना शांततेने विधानसभा चालवण्याचे आवाहन केले. सर्व विधानसभा सदस्यांनी शांततेने, निष्ठापूर्वक, नियमांना धरून चालावे. असे केल्याने मध्य प्रदेशचा गौरव राखला जाईल आणि लोकशाहीच्या परंपरेचेही रक्षण होईल, असे राज्यपाल म्हणाले.

मध्य प्रदेशमधील विधानसभेचे अधिवेशन विश्वासदर्शक ठराव न मांडताच २६ मार्चपर्यंत स्थगित कऱण्यात आल्यानंतर भाजपने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारला तातडीने विश्वासदर्शक ठराव मांडून त्यावर मतदान घेण्याचे निर्देश द्यावेत, या मागणीसाठी भाजपने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

News English Summery: The political battle in Madhya Pradesh has now reached the Supreme Court. Today, the Bharatiya Janata Party leader and former Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan have filed a petition in the Supreme Court after the majority of MPs in the state assembly. The petition demands that the Supreme Court order a majority of the trials within 48 hours. This petition was filed by Shivraj Singh Chouhan, MP of Madhya Pradesh Legislative Assembly. P. Prajapati is against it. Prajapati has postponed the assembly till March 26, citing the cause of the corona virus. The BJP MLA also made a stir.

 

News English Title: Story BJP Party moves in Supreme Court of India over Madhya Pradesh Trust vote after Assembly adjourned till March 26 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x