22 November 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राज्यात आणखी ४ नवे रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या ३७ वर

News Latest Updates, Corona Crisis, Mumbai, Minister Rajesh Tope

मुंबई, १६ मार्च : राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन ४ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्रात अजून चार जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामधील तिघे मुंबईतील तर एक नवी मुंबईतील आहे. यामधील दोन जण कुटुंबाच्या संपर्कात आले तर इतर दोघेजण परदेशात प्रवास करुन आलेले आहेत”. पनवेलमधील विलगीकरण कक्षात ३३ जणांना ठेवण्यात आलं असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. कोणीही पळून गेलेलं नसून चुकीची अफवा पसरली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे सावट आहे. रविवारपर्यंत भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या १०७ वर पोहचली. भारतातील कोरोनाबाधितांची सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३७ रुग्ण आढळले असून पुण्यात सर्वाधिक १६ रुग्ण आहेत. या सर्वांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

News English Summery: It is seen that the threat of corona is increasing in the state. According to information given by Health Minister Rajesh Tope, four more patients are reported to be positive. The number of coronary patients has now increased to 37 in the state. Three patients were diagnosed in Mumbai and one in Navi Mumbai, the health minister said. Schools, colleges, movie houses have been closed in view of Corona’s growing infection. Mumbai has also been warned with increasing alert for coronary infection in Pune. The administration has appealed not to go to crowded places.

 

News English Title: Story 4 more people have been tested positive for Corona Virus in Mumbai and Navi Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x