व्यवस्थित नियोजन करून मुंबई बंद केली तर? - पंकजा मुंडे
मुंबई, १७ मार्च: कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आपल्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण सध्या कोरोना व्हायरसच्या फेज २ मध्ये असून फेज ३ मध्ये जाऊ नये, यासाठी आपल्याला काळजी घ्यायची असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सांगितले. खासगी क्षेत्रात शटडाऊन गरजेचं आहे. अत्याआवश्यक सेवा वगळून ‘वर्क फ्रॉम होम’वर जवळपास सर्व कंपन्यानी सहमती दर्शवली आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक आणि मुंबईत लोकल, मेट्रो ट्रेन बंद करायच्या की नाही, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली.
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. गर्दीमुळे हा व्हायरस अधिक पसरण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी अजून कशी कमी करता येईल यावर राज्य सरकारचा भर आहे.
आज याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली. लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. जवळपास २५ कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवण्यात आला. त्यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, ‘करोना’चा फैलाव वाढत असल्यानं व महाराष्ट्रात पहिला बळी गेल्याचं समोर आल्यानं चिंता वाढली आहे. ‘करोना’चा सामना करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘काही दिवस मुंबई नियोजनपूर्वक बंद केली तर…? कदाचित संकट टळेल,’ असं मत पंकजांनी मांडलं आहे.
ट्विटरच्या माध्यमातून पंकजांनी ‘करोना’च्या फैलावाबद्दल चिंता व्यक्त करतानाच काही उपायही सुचवले आहेत. ‘व्यवस्थित नियोजन करून मुंबई बंद केली तर कदाचित करोनाच्या संकटाचा सामना करता येऊ शकतो. आधीच कल्पना दिल्यास लोक आवश्यक त्या गोष्टींचा साठा घरी करून ठेवू शकतील. मुंबईतील लोकल ट्रेन सात दिवस बंद राहिल्या तर लाखो लोकांना ‘करोना’च्या विषाणूपासून दूर ठेवता येऊ शकते. दुकानं केवळ अति महत्त्वाच्या खरेदीसाठी उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. कुठल्याही प्रकारच्या विंडो शॉपिंगला परवानगी देऊ नये. असा काही प्रयत्न करून पाहिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असं पंकजांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Can Mumbai lock down help? if it’s planned ppl can be prepared n stock things at home .local trains if closed for 7 days millions will be helped from exposure to the virus .stores can be opened for service but no window shopping only necessities made available ..Trying wil help!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 17, 2020
News English Summery: Concerns have been raised as the spread of ‘Corona’ and the first victim in Maharashtra came to light. Former minister and BJP leader Pankaja Munde has given an important advice to the government while the state government is working on the battlefield to deal with ‘Karona’. ‘If Mumbai is planned to be closed for a few days …? Perhaps the crisis will be averted, ‘Pankaj opined. Through Twitter, Pankaj has also suggested some measures while expressing concern over the spread of ‘Corona’. ‘If you close Mumbai with proper planning, it may be possible to deal with the problem of Corona. If already given ideas, people can stock up on what they need. If local trains in Mumbai are closed for seven days, millions can be kept away from the ‘Corona’ virus. Shops should only be allowed to open for very important purchases. No type of window shopping should be allowed. Pankaj Munde said in a tweet that such efforts could be beneficial.
News English Title: Story could Mumbai Lock down help BJP Leader Pankaja Munde tweet her opinion News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार