22 November 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील सर्व निवडणुकांना अनिश्चित काळासाठी स्थगिती

State Election Commission, Corona virus Crisis

मुंबई, १७ मार्च: राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की, राज्यात कोरोना विषाणूचा (कोव्हिड- १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई हाय कोर्टाचा १० ऑगस्ट २००५ रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज रोजी आहे. त्या टप्प्यांवर स्थगित करण्यात आले आहेत.

राज्यात शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे, तर खासगी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयातही येणाऱ्या बाहेरच्या लोकांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अशातच राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सध्या नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार या महानगरपालिका, ९ नगरपरिषद, १० पोटनिवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या याच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे.

 

News English Summery:  The outbreak of corona virus is increasing in the state. The State Election Commission has taken a big decision to stop it. State Election Commissioner Maharashtra said that all election procedures related to local self-government bodies in the state have been postponed till further orders. P. S. It is provided by Madan. The State Election Commissioner said that the State Election Commission has requested the State Election Commission to postpone the elections of local self-government organizations as a preventive measure to prevent the spread of corona virus (Covid-19) in the state. According to the Mumbai High Court’s result dated August 10, 2005, the State Election Commission reserves the right to postpone the election in the event of a natural disaster or emergency. In view of this matter, the State Election Commission has held all the programs related to all election related ward structures, voter lists and physical elections. Those stages have been postponed. Schools, colleges have been given vacation in the state while private workers have been ordered to work from home. Outside those who come to the ministry are also barred from entering. Similarly, the state election commission has decided to postpone the upcoming elections. Presently, the program of election is underway for Navi Mumbai, Aurangabad, Vasai-Virar Municipal Corporation, 9 Municipal Councils, 10 Potsi election, Zilla Parishad and Panchayat Samitis.

 

News English Title: Story Major decision by the Maharashtra State Election Commission stop all election process on corona virus crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#ElectionCommission(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x