6 January 2025 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | इरेडा सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337
x

मेतकूट..!

Laghu katha Metkut, Piyush Kahndekar

मी पोटापाण्यासाठी सध्या पुण्यात… माफ करा पुणेत आहे. घरी बायको-आई-बाबा असे त्रिकुट ठेऊन स्वतःच्या दोन ब्यागा आणि एकुलता एक लॅपटॉप उचलून पुणे गाठल. सुरुवातीला आठ दिवस घरी तोंड दाखवले. आता या गोष्टीलाही तीन महिने होतील. ९ ते ५ आपलं कार्यालयीन काम करून जमेल तसे घरी फोन आणि व्हिडिओ कॉलवर बडबड करतो. तसे बोलणे कमीच त्यामुळे ऐकणे जास्त होते. गेले चार आठ दिवस संपर्क कमी झालाय मुळात केला आहे. बडबड करण्यात स्वतःच लिखाण लिहिलं जात नाही म्हणून (खरे कारण घरी कधी येतोय या रोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून). तर सध्या हे त्रिकुट (बायको-आई-बाबा) माझे बोलणे किंवा साधे फोन करणे होत नाही म्हणून माझ्याविषयी बोलायचं मेतकूट साधतात.

त्यात माझी आवड-नावड अशा बऱ्याच गोष्टी बायकोने कळून घेतल्या एकंदरीत ओघवत्या प्रवाहात समजून घेतल्या. काल पर्वाची गोष्ट हे त्रिकुट असेच गप्पा मारत बसलेले. त्यात विषय पण मीच! माझं विषय होणे कधी संपणार माहिती नाही. आई आणि बायकोचा विषय रंगत गेला. आई “पियु, आला नाही, येत नाही म्हणून वाईट नको वाटून घेऊ. त्याच फिरले तर एका क्षणाचाही विलंब काय? पुढचा मागचा कोणताही विचार न करता राजीनामा देऊन कायमचा येईल.

तेवढा तो आहे, सहन करतो-करतो मग निर्णय असे घेऊन मोकळा होतो की समोरच्याला काय करावं कळत नाही. तो मार्गही ठेवत नाही. बस वाट बघ मग तो कुठेही असो, कुणाकडेही असो कारट्याला कोणत्याच परिणामांची चिंता काळजी कधीच वाटली नाही.” या आमच्या मातृश्रींच्या वक्तव्यावर आमचे पूज्य पीतृश्री आणि सौभाग्यवतीने खूप हसून घेतले. आता मला काळजी लागलीय कुणाची ते सांगायला हवं का? मेतकूट बनवण्याचा हा प्रपंच. बाकी जरा जपून आस्वाद घ्या..!

 

लेखक: पियुष खांडेकर

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x