तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण ?

प्रभाव टाकणारा व्यक्ती म्हणन खर तर चुकच ठरेल माझ्या दृष्टीकोनातून पण “प्रभावित” करणारा योग्य ठरेल….
तस तर एक पानठेल्यावाला आहे वय जवळपास १६ नाव सागर
मुळचा राहणार सावद्याचा जळगाव जिल्ह्यातल्या येणार्या काही गावांमधले एक… वडील लहानपणीच वारलेले कारण शेती थोडक्यात कर्ज, शेतकर्याच्या मृत्यूच कारण थोडक्यात आता आपण सर्वेच गृहीत धरतो तसच याच्या घरचं ही तेच कारण… राहत घर आहे तेव्हड बर तेपण गहाण होत त्याचा काका धावून आला म्हणून कसबस वाचलं… त्याच्या काकाच्या पान टपर्या आहेत इथे जळगावात त्याने नुकतीच १०वि ची परीक्षा पास केली फर्स्ट क्लास मध्ये कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता…
काकांच्या कृपेने एक टपरी तो सांभाळतो, नेमकी त्याची टपरी देशी गुत्त्याजवळच आहे त्यामुळे परिस्थितीने खालावलेले अन व्यसनाच्या आधीन गेलेल्या खेडूत अन शहरी दारूड्यांना हा पोरगा उपदेशाचे डोस पाजतो ते पण व्यसन करू नका म्हणून… माझ आपल कॉफी काही सुटत नाही म्हणून मी सहजच कुतूहल म्हणून त्याच बोलन ऐकत होतो अन विचारात पडत होतो, ताणून झोपायच्या काळात हा पोरगा पोटापाण्याचा व्यवसायही करतोय आणि कधी उपाशी राहिला तरी उद्या मोठे होण्याची स्वप्नही बघतोय त्याच्या त्या कोवळ्या वयातील प्रौढ विचारांनी मी खूप प्रभावित झालो न राहवून त्याची थोडी चौकशी पण केली त्याला खूप शिकायचं म्हणतो पण कुणाचे उपकार घेऊन नाही स्वताच्या स्वाभिमानाने आणि इमानदारीने कमवून शिकेल पण शिकेल. त्याच वय आणि व्यावहारिक बोलन एकूण एकदम प्रभावितच झालो…
बाकी पोरगा नावासारखाच मनानी आहे… अन मनात घर करून राहणारा आहे सध्या ११वि कॉमर्सला आहे…..
लेखक: पियुष खांडेकर
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | ही आहे टार्गेट प्राईस, 45 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON
-
Reliance Power Share Price | 3,044 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत अपडेट, मजबूत परताव्याचे संकेत - NSE: RPOWER
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC
-
Jio Finance Share Price | अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, जिओ फायनान्शिअ शेअर देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | यापूर्वी दिला 12,933 टक्के परतावा, भक्कम फंडामेंटल्स, वेदांता स्टॉक टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL