आई ICU'मध्ये...पण मुलगा निभावतोय सामान्यांप्रति आरोग्यमंत्री म्हणून कर्तव्य
मुंबई, १९ मार्च: देशात बुधवारी कोरोनाग्रस्त (Covid – 19) रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता १७५ पर्यंत पोहोचला आहे. एकीकडे महाराष्ट्रात तब्बल ४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका गल्फ देशांमध्ये गेलेल्या तब्बल २६,००० भारतीयांसाठी क्वारंटाइनची सोय करीत आहे.
आजपासून ते ३१ मार्च यादरम्यान दुबई, कुवेत, कतार आणि ओमेन या देशातून हे भारतीय येणार आहेत. साधारण २३ विमाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १९ मार्च ते ३१ मार्च या दरम्यान दाखल होतील. केंद्राने दिलेल्या नियमावलीनुसार या भारतीयांना पुढील १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राज्य सरकार जरी सर्व विषयांवर सतर्क दिसत असलं तरी यामध्ये महत्वाची भूमिका आणि जवाबदारी पार पाडत आहेत ते राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे असंच म्हणावं लागेल. स्वतःला देखील संसर्ग होऊ शकतो याची तमा ना बाळगता त्यांनी योग्य ती खबरदारी घेत प्रमुख शहरांमधील इस्पितळं ते आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
आज मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या स्क्रीनींग व्यवस्थेची पाहणी केली.स्क्रीनींग करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे अभिनंदन.काम करताना काय अडचणी येतात याबाबत चर्चा केली.#CoronaVirusUpdate pic.twitter.com/j3pZaFt3dk
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 19, 2020
मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असले तरी उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील कोरोना संदर्भातील महत्वाच्या बैठका आणि त्यानंतर प्रसार माध्यमांना संबोधित करणं यावर लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र मुख्यमंत्री प्रत्यक्ष मैदानावर उतरून इस्पितळात किंवा विमानतळांवर प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेताना दिसले नाहीत हे देखील दुसरं वास्तव जे कोणीही अधोरेखित केलेलं नाही. मात्र आरोग्य मंत्री राजेश टोपे मात्र प्रत्यक्ष मैदानावर दिसत असल्याने त्यांनी निभावलेली प्रामाणिक जवाबदारी कौतुकास्पद आहे हे मान्य करावं लागेल.
आज पुणे येथील नायडू हॉस्पिटलला भेट देऊन तिथल्या सुविधेची पाहणी केली.#LetsFightCorona #CoronaVirusUpdates pic.twitter.com/Wz29Ms5341
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020
विशेष म्हणजे या व्यस्त वेळापत्रकामुळे टोपे यांना आयसीयूमध्ये असलेल्या आईला भेटायलादेखील पुरेसा वेळ मिळत नाही. टोपेंच्या या कर्तव्यदक्षतेचं, त्यांच्याकडून सुरू असलेल्या अखंडपणे सुरू असलेल्या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. राजेश टोपे यांच्या आईवर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र टोपे यांना आईला भेटायलादेखील वेळ मिळत नाही. रोजच्या कामातून अवघी काही मिनिटं त्यांना आईसाठी मिळतात. त्यांचा बाकीचा दिवस कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात, उपाययोजनांचा, राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात जातो. मात्र कौटुंबिक जबाबदारीपेक्षा टोपेंनी राज्याच्या जनतेच्या जबाबदारीला प्राधान्य दिलंय. राजेश टोपे यांच्या सध्याच्या कामगिरीची तुलना शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील लातूर-किल्लारी भूकंपाच्या अनुभवाशीच करता येईल.
#CoronaCrisis: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आयसीयूमध्ये असलेल्या आईला भेटायलादेखील पुरेसा वेळ मिळत नाही. टोपेंच्या या कर्तव्यदक्षतेचं, त्यांच्याकडून सुरू असलेल्या अखंडपणे सुरू असलेल्या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. pic.twitter.com/8TKMMsP5QI
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) March 19, 2020
News English Summery: Though the Chief Minister is the head of the state, Uddhav Thackeray has focused on addressing important meetings in the ministry regarding Corona and then addressing the media. But the fact that the Chief Minister did not come down to the ground to review the actual situation at the hospitals or airports is also another fact that no one has underlined. However, since Health Minister Rajesh Tope appears on the field, he has to admit that the sincere responsibility he holds is praiseworthy. Significantly, this busy schedule does not allow Tope even enough time to visit his mother in the ICU. This capability of the caps is being appreciated on social media for their continuous work. Rajesh Tope’s mother is undergoing treatment at Bombay Hospital in Mumbai. But Tope also does not have time to visit his mother. They get only a few minutes from their daily chores. The rest of his day is spent reviewing key decisions, measures, conditions in the state to prevent Corona. However, the top priority of the people of the state rather than the family responsibility. The current performance of Rajesh Tope can be compared to the experience of the Latur-Killari earthquake during Sharad Pawar’s chief ministerial term.
News English Title: Story Health Minister Rajesh Tope taking all efforts curb corona virus crisis despite his mother hospital News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC