ते ढसाढसा रडले, फाशी घरात लोटांगण घातले; अखेर न्याय झालाच
मुंबई, २० मार्च: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री १२.०० वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
Tihar Director General Sandeep Goel: All four convicts (2012 Delhi gang-rape case) were hanged at 5:30 am. https://t.co/Bqv7RG8DtO pic.twitter.com/JFFdL3reF0
— ANI (@ANI) March 20, 2020
निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. तसंच अनेक अशी प्रकरणं बाहेर आली होती जी तोपर्यंत बाहेर येऊ शकली नाहीत. मुंबईतल्याही काही प्रकरणांना याच प्रकरणामुळे वाचा फुटली. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळ्या देशात एक आंदोलन उभं राहिलं होतं. ज्याची व्याप्ती दिल्लीत सर्वात मोठ्या प्रमाणावर होती. दरम्यान, दोषींच्या फाशीनं आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं व्यक्त केली होती.
कोठडीतून बाहेर काढण्यापूर्वी त्यांना काळा-कुडता पायजमा घातला गेला. चौघांचे हात मागच्या बाजूला बांधले गेले. यावेळी दोघांनी हात बांधण्यास नकार दिला. पण त्यांचं ऐकण्यात आलं नाही. फाशी देण्यापूर्वी दोषींना आंघोळ करून कपडे बदलण्यास सांगितलं गेलं. त्यावेळी विनयने कपडे बदलण्यास नकार दिला. तो रडू लागला आणि माफीही मागू लागला.
News English Summery: All four convicts of mass-murdering rape and murder cases that shook the whole country were hanged at Tihar Jail in Delhi on Friday morning. Nirbhaya’s mother expressed the feeling that Nirbhaya has got justice today after a long seven-year long court struggle. All the Nirbhaya convicts tried to prevent the death sentence till late Thursday night. The Delhi High Court dismissed the plea between 12.00 pm and upheld the death sentence. The whole country was shaken by the fearless case. A wave of anger has raged across the country since the 2012 incident. There were also cases that could not come out. Some cases in Mumbai have also been read due to this case. There was a movement all over the country to get justice for the fearless. Which was the largest in Delhi. Meanwhile, Nirbhaya’s mother had expressed reaction that the execution of the guilty would bring peace to her daughter’s soul.
News English Title: Story Nirbhaya rape case convicts hanged in Tihar Jail what happen before hanging last half hour News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार