जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी ३१ मार्चपर्यंत बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई, २० मार्च : अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या ३१ मार्चपर्यत ही बंदी राहणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, कोरोनाविरोधात जागतिक युध्द सुरु झाले आहे. सध्या कोणतेही शस्त्र या लढाईत वापरण्यासारखे नाही. संपूर्ण जग जगण्यासाठी एक सेकंदही न थांबता धावपळ करत असते. मात्र आता संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात थांबण्याची वेळ आली आहे. तसंच, सरकारकडून सांगितलेल्या नियमांचे नागरिकांकडून पालन होत आहे. मुंबईकरांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील गर्दीमध्ये फरक पडला आहे यापुढे देखील असेच सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
‘रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. त्या बंद करणे सोपं आहे, पण त्या बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर परिणाम होईल. महापालिका कर्मचारी, डॉक्टर यांची ने-आण कशी होईल. तुर्त या दोन सेवा बंद न करता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील २५ टक्क्यावर आणली आहे. यापूर्वी ती ५० टक्क्यांवर आणली होती. मुंबई महानगर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी बंद. ही बंदी ३१ मार्चपर्यंत असेल’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
News English Summery: Local and bus services in Mumbai will not be closed. Other than essential items, shops and offices will be closed. The ban will be in place until March 31. These rules will be in place for Mumbai, Pune, Pimpri-Chinchwad, Nagpur. The offices of all private companies in Mumbai should be closed. Chief Minister Uddhav Thackeray said that everyone will have to take precautions for the next 15 days. On the backdrop of the rapidly spreading corona virus in the state, the Chief Minister spoke to the people on Friday and urged all to cooperate. Chief Minister Uddhav Thackeray further said that a world war against Corona had begun. There is currently no weapon to be used in this battle. The whole world is running around without stopping for a second. But now is the time to stop at home to live the whole world. Also, the rules are being followed by the citizens. There is a good response from Mumbai. The Chief Minister said that there is a difference in the crowd in Mumbai.
News English Title: Story Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray says railway and bus service not be stop News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News