22 November 2024 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

#CoronaVirus : दहावीचा सोमवारचा पेपर पुढे ढकलला

Varsha Gaikawad, SSC Exam Postponed, Corona Crisis

मुंबई, २१ मार्च : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवारी होणारा पेपर आता ३१ मार्चनंतर होणार आहे. ३१ मार्चनंतर परिस्थिती पाहून पेपरची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोमवारी सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या विषयाचा पेपर होता.

मात्र आता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. नवी तारीख ३१ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. दहावीचा एकच पेपर उरला होता. जो २३ मार्च रोजी होणार होता. मात्र करोना व्हायरसची रुग्ण संख्या वाढल्याने आणि खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. इतके दिवस दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये बदल होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता वर्षा गायकवाड यांनी दहावीचा पेपर पुढे ढकलला आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शालेय परीक्षांसदर्भात शुक्रवारी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. १ ते ८वी पर्यंत सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.

 

News English Summery: The 10th standard paper has been postponed due to the increasing risk of corona in Maharashtra. Monday’s paper will now be held after March 31. “The date of the paper will be announced after March 31,” said Education Minister Varsha Gaikwad while talking to the media. On Monday, there was a paper on social science, Paper-2, geography. However, now the 10th paper on March 23 has also been canceled. Gaikwad has also said that the new date will be announced on or after March 31. Only one tenth of the paper was left. Which will take place on March 23. However, the state government has taken this decision as a precautionary measure due to the increase in the number of corona virus patients. It has been said that the tenth and twelfth exams will not change. But now Varsha Gaikwad has deferred the tenth paper. Meanwhile, important decisions were made on Friday regarding school exams due to the outbreak of coronavirus. All exams from 1st to 8th have been canceled. Gaikwad had said that the ninth and eleventh exams would be held after April 15.

 

News English Title:  Story Corona effect SSC Paper of Monday postponed says State Education Minister Varsha Gaikwad News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x