23 November 2024 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी, पोलिसांनी अनेकांना परत पाठवलं

Corona Crisis, Mumbai

मुंबई, २३ मार्च: राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू असतानाच मुंबई-पुण्यातील नागरिक मात्र बेपर्वाईने वागताना दिसत आहेत. मुंबई-पुण्यातील लोक आज नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुंबईत मुलुंड आणि सायन येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

देशात तसंच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच करोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनंही मोठी पावलं उचलली आहेत. राज्यात ३१ मार्चपर्यंत नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तर केंद्र सरकारनंही ३१ तारखेपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता, मात्र नको असलेली आवाहन करून त्यांनीच पुन्हा वातावरण गढूळ केल्याची टीका सुरु झाली आहे.

दरम्यान, सोमवारी मात्र सर्व नियम पयदळी तुडवल्याचे दिसून आले. बाहेर गावी जाण्यासाठी घराबाहेर पडणा-यांची संख्या वाढत आहे. पनवेल सायन महामार्गावरही सकाळपासूनच वाहनांची गर्दी दिसून आली. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश गाकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अंकूश खेडकर यांनी सकाळी साडे अकरा वाजता पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग बंद केला. अत्यावश्यक असणाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात आले. तर इतरांना यु टर्न मारावा लागला.

 

News English Summery: Due to the increasing prevalence of corona in the state, the state government has locked down the state. In order to prevent people from crowding, mobilization orders have also been issued. Citizens of Mumbai-Pune seem to be acting recklessly as all efforts are being made by the government. People in Mumbai-Pune took to the streets as usual today. Due to this, there was heavy traffic in Mulund and Sion in Mumbai. The prevalence of coronas is increasing in the country as well as in the state. Similarly, the state government has taken big steps to prevent the risk of coronation. The state government has decided to impose section 144 in urban areas by March 31. The central government has also decided to keep the railway services in the country closed till 31st. In addition, on Sunday, Prime Minister Narendra Modi had appealed to the people’s curfew. Citizens also responded favorably to his appeal, but he has been criticized for making the atmosphere again by making unwanted appeals.

 

News English Title: Story over rush vehicles Mumbai Police closed express highway News latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x