राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक व कठोर निर्णयांचा सल्ला
मुंबई, २३ मार्च : मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकल रेल्वे सेवा, बेस्ट बस आणि मेट्रोसेवा बंद झाल्यानं रोज गजबजणारी ठिकाणं आज सुनीसुनी वाटत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी सेवा मात्र सुरु असल्यानं रस्त्यावर वाहनांची वर्दळ काही प्रमाणात दिसत आहे. मुलुंड चेकनाक्यावर तर खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात दिसल्यानं जमावबंदी लागू केली तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप झाला नसल्याचं चित्र सोमवारी सकाळी दिसत होतं.
सोमवारी सकाळी दिसलेल्या परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली. कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यावर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
तसेच केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
दरम्यान, ‘एबीपी माझा’शी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यात आंतरराष्ट्रीय विमाने उतरवण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारने आता देशांतर्गत विमानेही बंद करायला हवीत, अशी सूचना मी त्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी यावर विचार सुरु असल्याचे सांगितले. काही मूठभर लोकांना अजूनही या विषाणूचे गांभीर्य कळत नाहीये. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही वाहने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. लोक कशामुळे घराबाहेर पडले आहेत. जनता कर्फ्यू एक टेस्ट केस होती. लोकांनी नाही ऐकले तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील.
हा आजार पसरला तर ते आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील, महाराष्ट्रातील लोकांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की, त्यांनी या आजाराला सहजपणे घेऊ नये. हा आकडा किती पसरला आहे, याची सरकरालाही कल्पना नाही. जर लोक घरी बसले तर सरकारलाही ही माहिती गोळा करणे सोपे जाईल. जे काही सुरु आहे, ते सर्व आपल्यासाठी आहे.
News English Summery: Raj Thackeray said, “I talked to Chief Minister Uddhav Thackeray over phone on Sunday evening. The state has banned flying of international planes. I advised them that the government should shut down domestic planes now. The Chief Minister said that the matter was under consideration. A handful of people still do not know the seriousness of the virus. On the second day of the lockdown, vehicles appear to be moving on the road. What made people leave home. The Janata curfew was a test case. If people do not listen, then the government will have to take drastic measures. Do you have a mechanism to cover the spread of the disease? He raised such a question. He urged the people of Maharashtra, in the country, to join hands and urge them not to take the disease easily. The government has no idea how far this figure has spread. If people sit at home, it will be easier for the government to collect this information. Whatever is going on, it’s all for you.
News English Title: Story MNS Chief Raj Thackeray praises Thackeray- government for action taken against Corona virus covid 19 News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC