24 November 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
x

अमेरिकेसारखी लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवार संतापले

Corona Crisis, Ajit Pawar, Indian Army

मुंबई, २६ मार्च: ‘लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ‘कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल’, असा कडक इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

राज्यात २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ असला तरी दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

“प्रवासबंदी असताना काही जणांनी दूधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बाब चिंताजनक आहे. वसईत पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं करोनाचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं,” असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

News English Summery:  ‘The United States has sought military assistance for the implementation of the lock down. It is our responsibility to not allow that time to come in our state ‘, said Deputy Chief Minister Ajit Pawar. Ajit Pawar has strongly warned that the attackers will be lodged against the policemen, medical officers and personnel who have done their duty to prevent Corona. Though there is a 21-day ‘lock down’ in the state, supply of essential commodities like milk, vegetables, fruits, medicines, cereals, cooking gas and other necessities continues. Nevertheless, the crowds of people shopping in the market are worried. Against this backdrop, he suggested that local self-government organizations should plan on making the necessary commodities available at home or in the community area.

 

News English Title:  Story Do not force to deploy Military in state says deputy CM Ajit Pawar while speaking about attack on police doctors News latest Updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x