ज्यांच्यासाठी थाळ्या-घंटानाद केला; त्यांच्यावरच फिल्मी देशभक्तांकडून घर खाली करण्यासाठी दबाव
मुंबई, २६ मार्च: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका वाढतोच आहे. दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्याही वाढून १२५ झाली आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या राज्यात ५ झाली आहे. सकाळी वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती असताना डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस यंत्रणा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत.
दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी भाडेतत्वावरील घरात राहणाऱ्या डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच. परंतु, नियमबाह्यही आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल, असे राज्य सरकारने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
विशेष म्हणजे हा तोच देशभक्ती समाज आहे ज्याने काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे थाळी आणि घंटानाद करून आभार मानले होते. एकूण भारतीयांची देशभक्ती ही समाज माध्यमांवर स्वतःचे व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध करण्याइतकीच शिल्लक राहिली आहे असंच म्हणावं लागेल. मात्र उद्या हेच डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस स्वार्थी झाले आणि लोकांसारखेच वागू लागले तर काय वेळ येईल याचा विचार न केलेलाच बरा असं म्हणावं लागेल.
News English Summery: In some places in the state, doctors, nursing staff and other health workers living in a rented house have received complaints that their respective homeowners or housing societies have been asking them to leave their homes in the wake of the Karona virus. This is very wrong in the eyes of humanity. But, it is beyond the rules. Homeowners and societies should cooperate with the importance of health systems. Otherwise, the concerned homeowner or housing society will be prosecuted in accordance with the Law of Disease Control, the state government has informed in a press release.
News English Title: Story if doctors nurses asked to vacate home then Government will take action News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार