22 November 2024 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

१० लाख किंमतीची व्हेंटिलेटर मशीन महिंद्रा कंपनी बनवणार ७ हजार ५०० रुपयात

Corona Crisis, Corona virus, Anand mahindra

मुंबई, २६ मार्च:  जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे. या भव्य रुग्णालयात तब्बल एक हजार खाटांची व्यवस्था असणार आहे.ओदिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसच्या साथीविषयी ताजी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६४९ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ४ जणांचे मृत्यू Covid-19 मुळे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. नागपूर आणि मुंबईत नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १२५ झाली आहे. त्यामुळे उपचार साहित्यांची मोठी गरज भासणार आहे यात शंका नाही. त्यानिमित्ताने उद्योजक देखील महत्वाचं पाऊल उचलत आहेत.

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मोठी घोषणा केली आहे. कंपनी अवघ्या ७५०० रुपयांत व्हेंटिलेटर बाजारात आणणार आहे. सध्या बाजारात व्हेंटिलेटरची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वाचवण्यासाठी व्हेंटिलेटर महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ऑटोमेटेड वॉल्व मास्क व्हेंटिलेटर, ज्याला सामान्यपणे अंबु बॅग असेही म्हटले जाते.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या एका टि्वटमध्ये म्हटले की, आम्ही देशी आयसीयू व्हेंटिलेटवर काम करत आहोत. या मशिनची सध्याची किंमत ५ ते १० लाख रुपये आहे. हे उपकरण जीवनरक्षक आहे आणि आमच्या टीमचा अंदाज आहे की, याची किंमत ७५०० रुपयांपेक्षा कमी असेल. यापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका म्हणाले होते की, कंपनी दोन मोठ्या सार्वजनिक कंपनी आणि एका व्हेंटिलेटर निर्माता कंपनीबरोबर यावर काम करत आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने याचे उत्पादन करता येईल.

 

News English Summery: Mahindra & Mahindra Company has made a big announcement to fight the Corona virus. The company will launch the ventilator for just Rs 7500. At present, ventilators are priced at around Rs 10 lakh. Ventilators are important to protect corona virus patients. We hope, however, that an automated valve mask ventilator, also commonly known as an ambu bag. Mahindra Group President Anand Mahindra said in a tweet, “We are working on a native ICU ventilate. The current price of this machine is 5 to 10 lakh rupees. The device is life-saving and our team estimates it will cost less than Rs.7500. Earlier, Managing Director of Mahindra & Mahindra Company Pawan Goenka had said that the company was working with two large public companies and one ventilator manufacturer. It can be produced in large numbers through this.

 

News English Title:  Story good News lock down due to corona virus for the first time 102 cities of the country got clear air News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x