३ महिने EMI संदर्भात RBI'ने बँकांना केवळ स्थगितीची परवानगी दिली आहे...जाणून घ्या
मुंबई, २७ मार्च : करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सरसकट कर्जदाराला ही सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरबीआयने केवळ बँकांना स्थगिती देण्याची परवानगी दिली आहे. यासाठी प्रत्येक कर्जदारास बँकेला विनंती करावी लागेल आणि कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे त्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे, हे सांगावे लागेल. बँकेने कर्जदाराची विनंती मान्य केल्यानंतरच याचा त्याला फायदा मिळणार आहे. अन्यथा कर्जदाराच्या खात्यातून पैसे वजा केले जातील. कर्जदाराला अर्ज करुन सर्व माहिती दिल्यानंतर बँक त्याबाबत निर्णय घेऊ शकेल.
आरबीआयने केवळ बँकांना स्थगिती देण्याची परवानगी दिली आहे. मात्र तुम्हाला तुमच्या बँकेकडून ईएमआय स्थगित करण्यासंदर्भात परवानगी मिळवावी लागणार आहे. याचा अर्थ बँकेकडून विशिष्ट मंजूरी येईपर्यंत ईएमआय तुमच्या खात्यातून वजा होताच राहणार आहे. इएमआय स्थगित केला गेला आहे की नाही यावर आरबीआयने अद्याप यावर तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. एकदा मार्गदर्शक तत्त्वे जारी झाल्यानंतर त्याबद्दल अधिक स्पष्टता येईल. त्यामुळे कोणताही धोका उचलू नका, अन्यथा तुमचा क्रेडिट स्कोर देखील खराब होईल आणि भविष्यात तुम्ही कर्ज घेण्यासाठी गेलात तर ते मंजूर होण्यात अडचणी निर्माण होतील.
News English Summary: Meanwhile, it has become clear that the borrower will not get this facility. RBI only allows banks to defer. For this, every borrower will have to make a request to the bank and state that the outbreak of the Corona virus has affected his income. It will be beneficial only after the bank accepts the borrower’s request. Otherwise the money from the debtor’s account will be deducted. After applying all the information to the borrower, the bank can decide on it.
News English Title: Story RBI Moratorium of 3 months on payment of installments EMI advice due to Corona Virus outbreak fact check News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल