22 November 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लॉकडाउन: कुठे मोटरसायकलवरून वडिलांचा मृतदेह तर कुठे अंत्ययात्रेत सोशल डिस्टन्स

Corona Crisis, Corona Virus

पालघर, २७ मार्च: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू असून रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कासा भागातील पालघर तालुक्यातील चिंचारे येथील एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या दोन मुलांनी चक्क दुचाकीवरून आपल्या घराकडे नेला. चिंचारेचे रहिवासी असलेल्या लडका देवजी वावरे (वय 60) यांना 24 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारांसाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्याचं सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला.

घरी आणल्यावर दुसऱ्या दिवसी (आज) त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. त्यांना मोटरसायकलवरून रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत त्यांची प्रकृती बिघडली आणि ते मृत पावले. मात्र घरी जाण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटरसायकलवरूनच माघारी नेण्याचा निर्णय घेतला. कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूर येथे एक वेगळेच चित्र पहायला मिळाले. अंत्ययात्रे दरम्यान नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी सकाळी शाहजहांपूर येथे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारने जनतेच्या हितासाठी सांगितलेल्या नियमांचे पालन अंत्ययात्रे दरम्यान करण्यात आले. या अंत्ययात्रेला नागरिकांनी गर्दी केली नव्हती. या अंत्ययात्रेमध्ये फक्त १० जण सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी तोंडाला मास्क लावले होते. प्रत्येकाने एकमेकांमध्ये तीन ते चार फूटाचे अंतर ठेवले होते. ऐवढेच नाही तर स्मशानभूमीमध्ये देखील सर्वजण एकमेकांपासून लांब उभे राहिले होते.

 

News English Summary: Lock down is currently underway in the country in the wake of the Corona virus, and traffic on the roads is completely blocked. So, the body of a man from Chinchare in Palghar taluka of Casa area was taken by his two sons by bike. The boy, Devji Waware, 60, a resident of Chinchare, had a snake bite on March 24 at 8 am. They were taken to a sub-district hospital at Casa for treatment. Medical officials said they were discharged the next day, saying the treatment was complete. The next day (today), when they were brought home, they felt restless again. As he was being taken to the hospital by motorcycle, his condition deteriorated and he was found dead. However, as the vehicle was not available to go home, both of their children decided to drive them off the motorcycle. Family members of the deceased are being blamed for the deaths due to lack of proper treatment by doctors at Casa Upazila Hospital.

 

News English Title: Story Corona Virus people kept took care of Social distancing during last rite in Uttar Pradesh and Father dead body on Bike News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x