24 November 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

कार बनवून खरेदी कोण करणार? मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्स उत्पादन सुद्धा करणार

Corona Crisis, Maruti Suzuki Mobilizes of ventilators

मुंबई, २८ मार्च: दोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसच्या साथीविषयी ताजी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली होती. दरम्यान आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८३७ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत ४ जणांचे मृत्यू Covid-19 मुळे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. नागपूर आणि मुंबईत नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १५९ झाली आहे. त्यामुळे उपचार साहित्यांची मोठी गरज भासणार आहे यात शंका नाही. त्यानिमित्ताने उद्योजक देखील महत्वाचं पाऊल उचलत आहेत.

त्यानंतर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या एका टि्वटमध्ये म्हटले होते की, आम्ही देशी आयसीयू व्हेंटिलेटवर काम करत आहोत. या मशिनची सध्याची किंमत ५ ते १० लाख रुपये आहे. हे उपकरण जीवनरक्षक आहे आणि आमच्या टीमचा अंदाज आहे की, याची किंमत ७५०० रुपयांपेक्षा कमी असेल. यापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका म्हणाले होते की, कंपनी दोन मोठ्या सार्वजनिक कंपनी आणि एका व्हेंटिलेटर निर्माता कंपनीबरोबर यावर काम करत आहे. या माध्यमातून मोठ्या संख्येने याचे उत्पादन करता येईल.

आता व्हेटिलेटर्सच्या उत्पादनासाठी आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने पुढाकार घेतला आहे. यासाठी मारुती सुझुकीने आरोग्यविषयक उपकरणे तयार करणाऱ्या AgVa हेल्थकेअर या कंपनीशी करार केला आहे. मारुतीच्या सहकार्यामुळे ही कंपनी व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनात वाढ करू शकते. कंपनीकडून शनिवारी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती देण्यात आली. तसेच वैद्यकीय उपकरणे, पर्सनल प्रोटेक्शन सूट्स यांचे उत्पादन वाढविण्याची सध्या सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे त्या क्षेत्रात मदत करण्याची तयारी मारुती सुझुकी कंपनीने दाखविली होती.

कंपनीने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, AgVa हेल्थकेअरशी झालेल्या सामंजस्य करारानुसार आता मारुती सुझुकी व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मदत करेल. महिन्याला दहा हजार व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. AgVa हेल्थकेअर ही व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनासाठी अधिकृत कंपनी आहे.

 

News English Summary: Maruti Suzuki, the country’s largest car maker, has now taken the lead in producing the ventilators that some patients use to combat the Corona virus. Maruti Suzuki has signed an agreement with AgVa Healthcare, a healthcare manufacturer. With the cooperation of Maruti, this company can increase the production of ventilators. On Saturday, the company released the newsletter in this regard. The company said in a statement on Saturday that it will now help Maruti Suzuki increase the production of ventilators under an annexation agreement with AgVa Healthcare. He plans to produce ten thousand ventilators a month. AgVa Healthcare is the authorized company for the production of ventilators.

 

News English Title: Story Maruti Suzuki Mobilizes production of ventilators masks to fight Corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x