22 November 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अनेक कंपन्या दिवाळखोर होऊन कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची लाट येणार: IMF प्रमुख

Corona Crisis, Covid 19, Corona Virus, IMF Chief Kristalina Georgieva

वॉशिंग्टन डीसी, २८ मार्च: “संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं आता स्पष्ट झालं असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटलंय. शुक्रवारी (दि.२७) एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी करोना व्हायरसमुळे जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं सांगत चिंता व्यक्त केली.

करोना व्हायरस जागातील १७५हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे. जगभरात करोना व्हायरसचे ५,२९,६१४ रुग्ण आढळून आले आहेत. तर १२१४५४ इतके रुग्ण बरे झाले आहेत. करोनाने जगातील मृतांचा आकडा २३७१४ पर्यंत गेला आहे. भारतात हा आकडा ७२४वर गेला आहे. तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसमुळे जगभरातील आर्थिक उलाढाल अचानक ठप्प झाली आहे. यामुळे बाजारांना उभारी देण्यासाठी २५०० अब्ज डॉलरची आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. हा आकडा कमी आहे. आतापर्यंत ८० हून अधिक देशांनी IMFकडे आपत्कालीन मदतीची मागणी केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

“करोना व्हायरस नावाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे आणि विकसनशील देशांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे”, असे जॉर्जीव्हा म्हणाल्या. “जागतिक अर्थव्यवस्था अचानक थांबल्याने अनेक कंपन्या दिवाळखोर होण्याची आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचीही लाट येईल ही प्रमुख चिंता आहे. त्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांना जवळपास २.५ ट्रिलियन डॉलरची गरज आहे. पण, ८० पेक्षा अधिक देशांनी आधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपात्कालीन मदतीची विनंती केली आहे.

 

News English Summary: “It is now clear that the whole world is in crisis, and the recession will be worse than the global financial crisis in 2009,” said Kristalina Georgieva, head of the International Monetary Fund. Speaking at an online press conference on Friday, Kristalina Georgieva expressed concern that the world was in crisis due to the Corona virus. “The global economy is hit hard by the epidemic called the Corona virus, and developing countries need huge funds to help them,” said Kristalina Georgieva. “The major concern is that with the sudden shutdown of the global economy, many companies will go bankrupt and then put employees on the job.” So emerging markets need around $ 2.5 trillion. However, more than 80 countries have already requested emergency assistance to the International Monetary Fund.

 

News English Title: Story corona virus outbreak Covid19 Clear we have entered recession says IMF Chief Kristalina Georgieva News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x