22 November 2024 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

निवडणूक प्रक्रियेत बदल, ईव्हीएम मशीन हद्दपार होणार ?

नवी दिल्ली : देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण भारतातील लोकशाही अबाधित ठेवण्याचे मोठे काम निवडणूक प्रक्रिया निभावत असते. त्याचाच भाग म्हणून देशातील निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हद्दपार होऊ शकतात.

भारतात पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाण्याची चिन्हं दिसत आहेत. २०१४ पासूनचा निकालानंतर आणि विविध पक्षांच्या आरोपानंतर भाजपने यावर गांभीर्याने विचार सुरु केला आहे. परंतु सर्वच पक्षांचं एकमत झाल्यास निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशिन हद्दपार करण्याची तयारी असल्याचे भाजपच्या गोटातून समजत आहे.

ईव्हीएम मशीन संबंधित विविध आरोपानंतर काँग्रेसने भविष्यातील निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु आता विविध आरोपानंतर भाजपने सुद्धा यांच्या भूमिकेत बदल केला आहे. ए.एन.आयशी बोलताना भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी प्रतिक्रिया दिली की जर विविध पक्षांना वाटत असेल तर आम्हाला परत मतपत्रिकेकडे वळण्यास काहीच अडचण किंव्हा हरकत नाही, केवळ सर्व बाजूंचा विचार करून चर्चा होण्याची गरज आहे. कारण निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनकडे वळवण्याचा निर्णय हा सर्वसहमतीने त्यावेळी घेण्यात आला होता, हे फक्त काँग्रेसने विसरू नये असं स्पष्टीकरण सुद्धा भाजपच्या राम माधव यांनी ए.एन.आयशी बोलताना दिल.

२०१४ नंतरच्या विविध निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून निवडणुका जिंकल्या जात आहेत असे आरोप विविध पक्षांकडून केले गेले. त्या आरोपांनी जास्त जोर धरला तो उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या यशाने. त्यानंतर काँग्रेस आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे हरकती दर्शविल्या होत्या. सध्या नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाचं अधिवेशन सुरु आहे आणि तिथे तशा आशयाचा ठराव सुद्धा काँग्रेसने मंजूर केला आहे. त्यानंतर पुन्हा भारतातील निवडणूक प्रक्रिया मतपत्रीकेकडे वळवण्याचा विषयाने जोर धरला आहे.

हॅशटॅग्स

#EVM Machine(4)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x