अर्थव्यवस्था कोसळण्याच्या भीतीने जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांची आत्महत्या
फ्रँकफर्ट, २९ मार्च : कोरोनामुळे अवघे जगच आर्थिक मंदीमध्ये प्रवेश करत असल्याचा इशारा आयएमएफने दिला आहे. याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसणार असल्याचे म्हटलेले असले तरीही विकसित देशांच्या अर्थव्यवस्थाही कोसळण्याच्या तयारीत आहेत. याचेच टेन्शन आल्याने जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
थॉमस शेफर असे या जर्मनीच्या अर्थमंत्र्यांचे नाव आहे. ते ५४ वर्षांचे होते. शनिवारी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडल्याचे राज्याचे प्रधान व्होल्कर बौफियर यांनी म्हटले आहे. सरकारी यंत्रणांनीही त्यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. आम्हाला शेफर यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त ऐकून धक्काच बसला असं ते म्हणाले. हेस्सेमध्येच जर्मनीची आर्थिक राजधानी फ्रँकफर्ट हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. शेफर हे मागील १० वर्षांपासून हेस्सेचे अर्थखाते सांभाळत होते. त्यांनी अर्थव्यवस्था सुधरण्याचे मोठे काम केलेले आहे. देशासमोरील कठीण काळामध्ये त्यांची गरज होती. त्यांचे कंपन्या आणि नागरिकांमध्ये वजन होते, असे उद्गार बौफियर यांनी काढले.
तत्पूर्वी “संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं आता स्पष्ट झालं असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटलं होतं. शुक्रवारी (दि.२७) एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी करोना व्हायरसमुळे जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. करोना व्हायरसमुळे जगभरातील आर्थिक उलाढाल अचानक ठप्प झाली आहे. यामुळे बाजारांना उभारी देण्यासाठी २५०० अब्ज डॉलरची आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. हा आकडा कमी आहे. आतापर्यंत ८० हून अधिक देशांनी IMFकडे आपत्कालीन मदतीची मागणी केली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.
.@KGeorgieva: It is now clear that we have entered a recession. We project a rebound in 2021, but only if we contain the virus and prevent liquidity problems from becoming a solvency issue. https://t.co/dg8FHiuftW #COVID19 pic.twitter.com/BIbFaRB48u
— IMF (@IMFNews) March 27, 2020
“करोना व्हायरस नावाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे आणि विकसनशील देशांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे”, असे जॉर्जीव्हा म्हणाल्या. “जागतिक अर्थव्यवस्था अचानक थांबल्याने अनेक कंपन्या दिवाळखोर होण्याची आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचीही लाट येईल ही प्रमुख चिंता आहे. त्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांना जवळपास २.५ ट्रिलियन डॉलरची गरज आहे. पण, ८० पेक्षा अधिक देशांनी आधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपात्कालीन मदतीची विनंती केली आहे.
News English Summary: The IMF has warned that the world is entering a financial meltdown because of Corona. Although the major impact of this is said to be to the developing countries, the economies of developed countries are also ready to collapse. The tensions have led to the shocking incident of suicide by German finance ministers of the Hesse state. Thomas Scheffer is the German finance minister. He was 54 years old. The body was found on the railway tracks Saturday, state head Volker Baufier said. Government agencies also said their death was a suicide. “We were shocked to hear that Shaffer had committed suicide,” he said. Frankfurt, Germany’s financial capital, is an international city in Hesse. Shaffer has been managing Hesse finance for the past 10 years. They have done a great job of improving the economy. They were needed in difficult times before the country. Bauffier said they had weight among companies and citizens.
News English Title: Story Corona Virus shocking Hesses German Minister of Finance Schafer commits suicide after crisis worries after IMF statement over recession News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार